इंदिरानगर येथे माजी न.प.उपाध्यक्ष अनिल भाऊ कुनघाडकर यांच्या हस्ते हणुमान मंदिराचे भुमीपुजनवार्ड वासियांनी लोकवर्गणीतून हणुमान मंदिर उभारणार

दि.15/04/2023गडचिरोली : इंदिरानगर येथे किशोर सुरनकर यांच्या घरासमोरील आवारात वॉर्ड वासियांनी लोकवर्गणीच्या माध्यमातुन हणुमान मंदिर उभारणार असून अनिलभाऊ कुनघाडकर यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. तसेच विविध समस्यां जाणून घेतले, यावेळी वॉर्डतील गल्ली रस्ते, नाली आदि प्रमुख समस्या असल्याचे यावेळी नागरिकांनी सांगितले, तसेच येथिल नागरिकांनी एकञीत बैठक घेऊन अनेक विषयावर चर्चा केली असता समस्यांची निराकरण करण्यात येईल असे म्हटले.

यावेळी ,राजेश तुरनकर, शुभम कालोजवार,महेश रामेलवार,संकेत तुरानकर,राहुल तुरानकर,प्रमोद दिकोंडावार,नाशीरभाई शाह इतर गावकरी मंडळी उपस्थित होते.