कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत वंचित बहुजन आघाडीच्या उडी* *आंबेडकरी चळवळीच्या गडचिरोलीच्या ईतिहासात प्रथमच ख-या आंबेडकरवादी पक्षाची कृषी उत्पन्न बाजार समितीत एंट्री


गडचिरोली,
          कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सार्वत्रिक निवडणूकीत वंचित बहुजन आघाडीेने गडचिरोली येथे तिन व चामोर्शी येथे एक असे उमेदवार उतरविल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणूकीत रंगत निर्माण झाली असून विरोधकांचे धाबे दणानले असल्याचे बोलले जात आहे, वंचितच्या एंट्रीमूळे कोणत्या पक्षाचे नेमके कोण आपला गड राखतील हे नेमके सांगता येणार नसले तरी वंचित आपले उमेदवार निवडून आणण्यात किती यशस्वी होते व कोणाचे गणित बिघडवते याकडे गडचिरोली व चामोर्शी वासियांचे लक्ष लागले आहे.
          आंबेडकरी चळवळीच्या गडचिरोलीच्या ईतिहासात प्रथमच एका आंबेडकरवादी पक्षाने उमेदवार उतरविल्याने निवडणूकीत मोठी चूरस निर्माण झाली आहे. त्यामूळे वंचितचे दोन्ही ठिकाणचे उमेदवार विजयी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
        गडचिरोली येथे जिल्हाध्यक्ष बाळू टेंभुर्णे यांच्या प्रमुख उपस्थितीत उमेदवारांचे तिन फार्म तर चामोर्शी येथे देवानंद दुर्गे यांच्या उपस्थितीत एक फार्म भरण्यात आले आहे.
     गडचिरोली येथे फार्म भरतांना तालुकाध्यक्ष बाशिद शेख, शहराध्यक्ष दिलीप बांबोळे, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख जावेद शेख, तालुका उपाध्यक्ष मुकेश डोंगरे, चांदाळा येथिल वाढई व कुमरे आदि कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.