गडचिरोली - बोगस बोगस कागदपत्रांच्या पाहणाऱ्यांना गडचिरोली आधारे पोलिसात पोलिस दलाने जेरबंद नोकरी मिळविण्याचे प्रकरण
कागदपत्रांच्या आधारे पोलिस दलात प्रवेश करू केले आहे. यात पाच जणांचा समावेश आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार या सर्वांची ९ दिवसांच्या पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. मात्र पुढील तपासाच्या अनुषंगाने आरोपींची नावे उघड करण्यास पोलिसांनी नकार दिला आहे.
गडचिरोली चालक पोलिस शिपाई व पोलिस शिपाई या भरती प्रक्रियेची नोव्हेंबर २०२२ पासून सुरवात झाली. भरतीच्या कुठल्याही टप्प्यावर गैरप्रकार अथवा बेकायदेशीर मार्गाचा अवलंब केला जावू नये, याकरीता पोलिस अधिक्षक नीलोत्पल यांनी वेळोवेळी
उमेदवारांना तसेच सामान्य नागरीकांना आवाहन करून त्यांना कुठल्याही गैरप्रकाराबाबत माहिती
मिळाल्यास तात्काळ माहिती देण्याबाबत आवाहन केले होते. त्या अनुषंगाने भरती प्रक्रियेशी निगडीत येणाऱ्या प्रत्येक आक्षेपासंदर्भात पोलिस अधिक्षक निलोत्पल हे जातीने लक्ष देवुन निराकरण करीत होते. दरम्यान बोगस कागदपत्रांच्या आधारे नोकरी मिळविण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाच जणांना अटक करण्यात आली. त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आले. न्यायालयाने सर्वांची ९ दिवसाच्या पोलिस कोठडीत रवानगी केली आहे.