खासदार अशोकजी नेते यांच्या जनसंपर्क कार्यालय गडचिरोली येथे विश्वरत्न, महामानव,भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती साजरी*.


-----------------------------------------------
खासदार श्री.अशोकजी नेते यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन,दीप प्रज्वलन व माल्यार्पण करून कोटी कोटी नमन करत अभिवादन केले


दिनेश बनकर कार्यकारी संपादक 

दि.१४ एप्रिल..

गडचिरोली. देशात आणि राज्यात आज १४ एप्रिल भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जात आहे. त्यानिमित्ताने खासदार अशोकजी नेते यांच्या जनसंपर्क कार्यालय गडचिरोली येथे परमपूज्य, महामानव,भारतरत्न, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला दिप प्रज्वल,व पुष्पहार अर्पण करून कोटी कोटी अभिवादन करण्यात आले.
या जयंती कार्यक्रमांच्या आयोजन प्रसंगी खासदार अशोकजी नेते यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकत मार्गदर्शन करतांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर न्याय व समानतेसाठी संघर्ष केला,समाजातील दीनदलितांना समानता आणण्यासाठी आयुष्यभर लढा दिला. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी आजही लाखो तरुण प्रेरित आहेत. त्यांची शिकवण आणि त्यांचा विचारांचे अनुसरण केल्यामुळे त्यांचं आयुष्याला नवीन दिशा मिळाली आहे.असे वक्तव्य याप्रसंगी खासदार अशोकजी नेते यांनी केले.
 
यावेळी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री भाजपा अनु.जनजाती मोर्चाचे अशोकजी नेते,प्रदेश सरचिटणीस एसटी मोर्चा चे प्रकाशजी गेडाम, जिल्हा संघटन महामंत्री रविंद्र ओल्लालवार,जिल्हा महामंत्री प्रमोद जी पिपरे,जिल्हा उपाध्यक्ष डॉ.भारत खटी,माजी नगराध्यक्ष योगिता ताई पिपरे,शहराध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, माजी सभापती रंजिताताई कोडाप, अनु.जाती मोर्चा जिल्हा महामंत्री साखरेजी,शहराध्यक्षा अर्चनाताई निंबोड,जिल्हा सचिव महिला आघाडीच्या गिताताई हिंगे,जनजाती महिला मोर्चा च्या महामंत्री वर्षाताई शेडमाके,माजी सभापती वैष्णवी नैताम,शहर महामंत्री विनोद देवोजवार,शहर महामंत्री केशव निंबोड,माजी नगरसेवक देवाजी लाटकर,अनिल पोहनकर,अनिल कुनघाडकर,प्रा.उराडे सर, गोवार्धन चव्हाण सर,अविनाश विश्रोजवार, डेडूजी राऊत, विवेक बैस,श्रीकांत पतरंगे, नितेश खडसे,हर्षल गेडाम,जैराम चलाख तसेच अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.