नवीन नवरीचा अपघातात मृत्यू, पती गंभीर जखमी



दिनेश बनकर कार्यकारी संपादक 

दर्यापूर (वा) : कार व दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात नवविवाहितेचा मृत्यू झाला, तर तिचा पती गंभीर जखमी झाला. ही घटना रविवारी दुपारी 2 वाजताच्या सुमारास दर्यापूर ते भातकुली मार्गावर घडली.

दर्यापूर तालुक्यातील आराळा येथील रहिवासी कौस्तुभ उद्धवराव जीवने याचे एक महिन्यात पूर्वीच लग्न झालेले आहे. ते त्याच्या पत्नीला घेऊन दुचाकी क्रमांक एम एच 27 सीके 7234 ने दर्यापूरवरून भातकुलीमार्गे अमरावती येथे हॉस्पिटलच्या कामानिमित्त जात होते. दरम्यान मुख्य रस्त्याच्या बाजूला असलेल्या फार्म हाऊसमधून अचानक चारचाकी क्रमांक एमएस 27 बीई 4423 चे वाहन रस्त्यावर आले आणि त्याचवेळी कौस्तुभ यांची दुचाकी चारचाकी वाहनावर धडकली. या अपघातात दुचाकीवरील जीवने दाम्पत्य गंभीर जखमी झाले. या अपघातामध्ये

कौस्तुभ यांच्या पत्नीचा जागीच मृत्यू झाला, तर कौस्तुभ हे जखमी झाले. जखमींना रुग्णसेवक अमोल ठाकरे, वाहतूक पोलिस पाथरे यांनी दर्यापूर येथे उपजिल्हा रुग्णालयात उपचार करता दाखल केले, मात्र जखमी पती-पत्नी त्यांची प्रकृती अतिशय चिंताजनक असल्याने त्यांना तातडीने अमरावती येथे पुढील उपचाराकरता रेफर करण्यात आले आहे. यामध्ये दुचाकी चालकाच्या पत्नीची प्रकृती गंभीर आहे. दर्यापूर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला, पुढील तपास पोलिस करीत आहे.