रात्रभर शारीरिक संबंध ठेवल्यावर सकाळी प्रियकर लटकलेल्या अस्वस्थेत


देशात एक खळबळजनक असे प्रकरण सध्या झारखंड मधील जमशेदपूर परिसरात समोर आलेले असून प्रेयसीने प्रियकराशी शारीरिक संबंध ठेवल्यानंतर हत्या केलेली आहे. हत्या करण्यापूर्वी दोघांनी रात्रभर शारीरिक संबंध ठेवले आणि त्यानंतर महिला ही तिच्या प्रियकराची हत्या करून फरार झाली. पोलिसांनी त्यानंतर तिला ताब्यात घेतलेले आहे.

उपलब्ध माहितीनुसार, पुजारी सुबोध पांडे असे मयत प्रियकराचे नाव असुन शारदा तिवारी असे आरोपी महिलेचे नाव आहे. शारदा आणि सुबोध हे दोघेही विवाहित असून शारदा हिला तीन मुले आहेत तर सुबोध याला दोन मुले आहेत. दोघांचीही लग्न झालेले असली तरी ते एकमेकांना नियमितपणे भेटायचे आणि त्यानंतर शारीरिक संबंध ठेवायचे. दोघांच्याही घरी माहीत झाल्यानंतर अखेर त्यांनी भाड्याच्या घरात लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये रहायला सुरू केलेले होते.


शारदा तिवारी हिला ताब्यात घेण्यात आल्यानंतर तिने जे काही सांगितले ते ऐकून पोलीसही चकीत झाले. शारदा हिने म्हटले की, ‘ ज्या दिवशी मी त्याचा खून केला त्या दिवशी म्हणजेच दोन मार्च रोजी आम्ही दोघांनी रात्री भरपूर दारू पिलेली होती त्यानंतर रात्रभर आम्ही एकमेकांसोबत शारीरिक संबंध ठेवले मात्र रात्री आमच्यात किरकोळ कारणावरून वाद सुरू झाला आणि त्यानंतर सुबोध याने रागाच्या भरात फास काढला आणि स्टूलवर चढला. आत्महत्या करण्याची तो सतत धमकी देत होता त्यामुळे अखेर मी स्टूलला धक्का दिला आणि त्यानंतर तो फासावर लटकला .संतापाच्या भरात मी देखील त्याचा जीव वाचवण्याचा कुठलाही प्रयत्न केला नाही मात्र तरी देखील तो तडफडत असल्याने त्याचा गळा दाबून खून केला त्यानंतर पलायन केले . ‘


पोलिसांनी सहा मार्च रोजी मृतदेह आढळून आल्यानंतर शारदा हिचा तपास सुरू केलेला होता. महिलेच्या म्हणण्याप्रमाणे आरोपीने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि तिचे दागिने तसेच शेत देखील विकून टाकले त्यानंतर त्यांच्यात भांडणे सुरु झाली आणि पैसे परत मागितल्यावर वाद सुरू होत असल्याने हा प्रकार घडल्याची प्राथमिक माहिती आहे .