गडचिरोली : दुचाकी अपघातात; दोन युवक जागीच ठारदिनेश बनकर कार्यकारी संपादक 

गडचिरोली : भरधाव दुचाकीने नदीच्या सुरक्षा रेलिंगला धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन युवक जागीच ठार झाल्याची घटना गुरुवारी रात्री 9 वाजताच्या सुमारास चंद्रपूर मार्गावरील वैनगंगा नदीच्या लहान पुलाजवळ घडली. हा अपघात एवढा भीषण होता की, अपघातग्रस्त दुचाकी जळून खाक झाली. मृतकांमध्ये योगेश लोहाट (23) रा. साखरा, निकेश बांबोळे (21) रा. चुरचुरा यांचा समावेश आहे.

प्राप्त माहितीनुसार, गुरुवारी विवाह समारंभ आटोपून योगेश आणि निकेश आपल्या मित्रांसोबत चंद्रपूर जिल्ह्यातील सावली परिसरात गेले होते. रात्रीच्यावेळी योगेश व निकेश हे दोघे एका दुचाकीने गावाकडे परत येत होते. दरम्यान, वैनगंगा नदीच्या लहान पुलियावर पोहचताच त्यांची दुचाकी अनियंत्रित होऊन सुरक्षा रेलिंगवर - धडकली. या भीषण अपघातात योगेश व निकेशचा घटनास्थळावरच मृत्यू झाला. विशेष म्हणजे, अपघातानंतर दुचाकीने पेट घेतला.