मनरेगा कामामध्ये ३ दोषी ग्रामसेवकांना मुख्य कार्यकारी अधिकारी ने केले निलंबित,उर्वरितांची विभागीय चौकशी सुरू
गडचिरोली : महात्मा गांधी राष्ट्रिय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत गडचिरोली जिल्हयातील भामरागड, अहेरी व मुलचेरा या तालुक्यातील करोडो रुपयाची बोगस कामे तसेच काम न करता पैशाची उचल करणाऱ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कार्यवाही करण्याबाबतचे तक्रार पत्र निवासी उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी कार्यालय, गडचिरोली यांचे पत्र दिनांक ०८.१२.२०२२ अन्वये प्राप्त झाले होते. त्याअनुषंगाने या कार्यालयाचे दिनांक २२/१२/२०२२ चे आदेशान्वये श्री. रविंद्र एस. कणसे उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रा.पं.) जिल्हा परिषद, गडचिरोली यांचे अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्यात आली होती. सदर समितीने दि.२४/०२/२०२३ अन्वये चौकशी अहवाल सादर केलेला होता.

प्राप्त चौकशी अहवालामध्ये भामरागड येथील गट विकास अधिकारी, शाखा अभियंता, सहाय्यक लेखा अधिकारी, विस्तार अधिकारी (पंचायत), व ६ ग्रामसेवक इत्यादी प्रथम दर्शनी दोषी आढळुन आल्याने दोन ग्रामसेवकांना तात्काळ निलंबित करण्यात आले असुन ६ ग्रामसेवक व शाखा अभियंता यांचेवर विभागीय चौकशी सुरु करण्यात आलेली आहे. तसेच गट विकास अधिकारी यांचेविरुध्द शिस्तभंग विषयक कार्यवाही करण्याकरीता विभागीय चौकशी प्रस्ताव शासनाकडे जोडपत्र १ ते ४ मध्ये सादर करण्यात आलेला आहे. तांत्रीक सहाय्यक (TPO) यांना काढुन टाकण्याबाबतची कार्यवाही सुरु करण्यात आलेली आहे. तसेच अहेरी येथील एक ग्रामसेवक प्रथमदर्शनी दोषी आढळल्याने त्यांना निलंबित करण्यात आले आहे.

निलंबित ग्रामसेवक
¶¶¶
१) विशाल एस. चिडे ग्रामसेवक ग्रामपंचायत मनेराजाराम (पंचायत समिती भामरागड)

२) सुनील बी. जट्टीवार ग्रामसेवक ग्रामपंचायत बोठनफुंडी (पंचायत समिती भामरागड)

३) लोमेश यादवराव सिडाम ग्रामसेवक ग्रामपंचायत उमानुर (पंचायत समिती अहेरी )