आरमोरी तालुक्यातील शिवणी खुर्द, मोहझरी, नागरवाही, सुकाळा , देलनवाडी व इतर भागात लोडशेडिंगच्या नावाखाली विजेचा लपंडाव


आरमोरी: आता उन्हाळा सुरू झाला असून उन्हाचा पारा वाढताच आहे. त्यामुळे सावलीसह गारव्याची नितांत आवश्यकता आहे. अशातच दुपार असो अथवा रात्र, (Mahavitran) वीज गेली तर अंगाची लाहीलाही होत आहे. अशी परिस्थिती असताना (Mahavitran) महावितरणतर्फे आरमोरी तालुक्यातील शिवणी खुर्द, मोहझरी, नागरवाही, सुकाळा या गावात होणारा वीजपुरवठा मात्र दिवसा रात्रीतून जवळपास 5 तास खंडित होत आहे. नेमका हा वीज पुरवठा खंडित का होत असेल, ही वीज लपंडाव का खेळत असेल, अशा अनेक प्रश्नांंचे जनसामान्यांच्या मनात काहूर माजलेले आहे.
 
हा लोडशेडींगचा प्रकार मागील काही दिवसापासून सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना मच्छारासोबत रात्र जागून काढावी लागत आहे. तसेच ग्रामीण भागात जंगली प्राण्यांचा वावर असते वीज नसल्याने रात्री एखादया वेळेस अनुचित घटना घडण्याची शक्यता अधिक असते . मोठ्या शहरात रात्र- दिवस वीज सुरू असते पण ग्रामीण भागात लोडशेडींगच्या नावाखाली वीज बंद केली जाते. शहरी भागात कोण असतात? आणि ग्रामीण भागात कोण असतात ?शेवटी माणसचं असतात न? मग हा महावितरणचा भेदभाव कसा काय ? असा प्रश्न ग्रामीण भागातील नागरिकांना पडलेला आहे. 


 
महावितरणविषयी लोकांच्या मनात रागाचा पारासुद्धा चढलेलाच आहे. वीज बिल वसुलीसाठी (Mahavitran) महावितरण मात्र सक्ती करताना दिसते. मग वीजपुरवठा सुरळीत का देऊ शकत नाही, आधी वीज सुरळीत द्या, नंतरच वीजबिलाची सक्ती करा असे अनेक मुद्दे नागरिक उपस्थित करताना दिसत आहेत.
 
 या संबंधाने गडचिरोली येथील हेल्पलाईन नंबरवर विचारणा केली असता विजेचा लोड पुरत नसल्यामुळे काही वेळा करीता विज बंद करावी लागत आहे असे उत्तर त्यांच्याकडून मिळाले. पण हा नियम फक्त ग्रामीण भागातील नागरिकांना लागू करण्यात आला काय?असा प्रश्न ग्रामीण भागातील नागरिक महावितरणला विचारत आहेत. त्यामुळे महावितरण कंपनीने ग्राहकांना वीज उपलब्ध करून देण्याकरीता इतर पर्याय निवडावा आणि ग्राहकांना विजेच्या पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी नागरिकांनी महावितरण कडे केली आहे.


दिवसातून असो वा रात्रीतून जर वारंवार वीजपुरवठा खंडित होत असेल तर या बाबीकडे वरिष्ठ लक्ष देतील का? शिवणी खुर्द, मोहझरी, नागरवाही, सुकाळा , देलनवाडी, वैरागड या गावांना होणारा विजेचा लपंडाव थांबून ग्राहकांना वीजपुरवठा सुरळीत मिळणार का, अशी विचारणा वीज ग्राहक करित आहेत.