गडचिरोली _ पिपल्स रिपब्लिकन पार्टी चे राष्ट्रीय अध्यक्ष,लाँगमार्च प्रणेते माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांचा वाढदिवश नागपूर येथील पक्ष कार्यालयात पिरिपा पक्षाचे केंद्रिय सरचिटणीस चरणदास इंगोले यांच्या अध्यक्षतेखाली तर पिपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जयदिप कवाडे ' रंजना कवाडे , कार्यालयीन प्रमुख दिलीप पाटील आदिच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. याप्रसंगी शुभेच्छा देतांना चरणदास इंगोले म्हणाले की , कवाडे सर हे तडफदार नेतृत्व आहेत. ते लाँगमार्च प्रणेते असुन विदर्भातील विर म्हणुन प्रख्यात आहेत आजही वयाच्या ७५ व्या वर्षी तरुणपणातील रोखठोक आवाज संपुर्ण महाराष्ट्रात गुंजतो याहि वयात दररोजच संपुर्ण महाराष्ट्रात राजकारणा सोबत समाज कार्यासाठी सदैव झटत असतात अश्या या महान व्यक्तीचा आज सत्कार होत आहे. हि गौरवास्पद गोष्ट आहे. प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी सांगितले की , माझ्यावर आणि पिरिपा पक्षावर प्रेम दाखविणार्या माझ्या असंख्य कार्यकत्यांनी माझ्या वर जो विश्वास दाखविला त्यांचे मी आभार मानतो शेवटी कार्यकर्ता हाच खरा पक्षाचा कणा आहे.
याप्रसंगी संपूर्ण विदर्भातील प्रमुख नेत्यांनी पुप्प गुच्छ देवून , प्रा. कवाडे सरावर फुलांचा वर्षाव करून ढोल ताशाच्या गजरात सरांचा वाढदिवश साजरा केला. कार्यक्रमास प्रामुख्याने गडचिरोली जिल्ह्य प्रमुख प्रा. मुनिश्वर बोरकर , चंद्रपूर जिल्हा प्रमुख हरिष दुर्याधन , यवतमाळ महिला प्रमुख बबिता गेडाम , नागपूर महिला प्रमुख रत्ना मोहाळ ' नागपूर युवा महिला प्रमुख सुनिता कोटांगले 'अभय चव्हाण , गडचिरोली जिल्ह्यतुन प्रमोद खोबागडे , अमोल कन्हाडे , सहीत बहुसंख्य पिरिपा कार्यकर्ते व प्रा. कवाडे सराचे चाहते प्रामुख्याने उपस्थित होते.