दिनेश बनकर कार्यकारी संपादक
*◆अहेरी◆* : *मूलचेरा तालुक्यातील विश्वनाथनगर येथील रवीन दास यांची पत्नी पोटाच्या आजाराने त्रस्त असून घरची परिस्थिती अत्यंत हलाकीची आहे, उपचार घेण्यास अडचण होत आहे. म्हणून आज रविन दास यांनी आलापल्ली येथे भारत राष्ट्र समितीचे नेते,आदिवासी विद्यार्थी संघाचे विभागीय अध्यक्ष तथा माजी आमदार दिपकदादा आत्राम यांच्या निवासस्थानी भेट घेऊन आपली परिस्थिती सांगीतल्यावर माजी आमदार दिपकदादा आत्राम यांनी शस्त्रक्रियासाठी आर्थिक मदत केले.*
*या वेळी अजय दास,माजी सरपंच विजय कुसनाके,विनोद कावेरी,जुलेख शेख,सुधाकर कोरेत,महेश सडमेक,किशोर कामथे उपस्थित होते.*