भाजपा -शिवसेनेतर्फे गडचिरोली विधानसभा क्षेत्रात ४ व ६ एप्रिल ला सावरकर गौरव यात्रा*आ. डॉक्टर देवराव होळी यांची माहिती*

*४ एप्रिलला धानोरा सकाळी ११:३० व सायंकाळी ४ वाजता गडचिरोली शहरात तर ६ एप्रिलला चामोर्शीत यात्रेचा समारोप*

*दिनांक १ एप्रिल २०२३ गडचिरोली*

*भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील धगधगते यज्ञकुंड स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील कामगिरीचे स्मरण करून देण्यासाठी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेतर्फे गडचिरोली विधानसभा क्षेत्रात ४ व ६ एप्रिलला सावरकर गौरव यात्रा काढण्यात येणार असल्याची माहिती गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी या प्रसिद्धी माध्यमातून माध्यमातून दिली आहे.*

*गडचिरोली विधानसभा क्षेत्रामध्ये दिनांक ४ एप्रिलला धानोरा येथे सकाळी ११:३० व गडचिरोली शहरात सायंकाळी ४ वाजता ही गौरव यात्रा काढण्यात येणार आहे. या यात्रेचा समारोप दिनांक ६ एप्रिलला चामोर्शी शहरात भव्य यात्रा काढून करण्यात येणार आहे.*

*ज्या स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पायाची धूळ होण्याची सुद्धा ज्यांची योग्यता नाही ते आज त्यांच्यावर अपमानजनक टीका करीत आहेत. त्यांच्या बद्दल चुकीची माहिती प्रसारमाध्यमांच्या माध्यमातून प्रसारित केली जात आहे. हे अतिशय चुकीचे व निंदनीय आहे. येणाऱ्या पिढीला स्वातंत्र्यवीर सावरकर कोण होते, त्यांची देशातील स्वातंत्र्यलढ्यात व सामाजिक सुधारणांमध्ये असलेले कामगिरी येणाऱ्या तरुण पिढीला माहीत व्हावी याकरिता संपूर्ण राज्यातील २८८ विधानसभा क्षेत्रात सावरकर गौरव यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. त्यातूनच गडचिरोली विधानसभा क्षेत्रामध्ये या यात्रेचे आयोजन करण्यात आली असल्याची माहिती आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी या माध्यमातून दिली आहे.*