अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी युवकास अटक




गडचिरोली : मुलचेरा तालुक्यातील अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणात मुलचेरा पोलिसांनी एका आरोपी युवकास अटक केली आहे. न्यायालयाच्या निर्देशानुसार त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. राजू तपण मंडल (२२) रा. श्रीरामपूर असे त्याचे नाव आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक अशोक भापकर यांनी दिलेल्या

माहितीनुसार या प्रकरणातील आरोपी युवक राजू मंडल याचे पिडीतेसाबत वर्षभरापूर्वी

मोबाईलवर संभाषण होत होते. मात्र पिडीतेच्या वडीलांनी अल्पवयीन बालीकेला हटकल्यानंतर तिने त्याच्याशी बोलणे बंद केले. यानंतर राजू मंडल हा पिडीतेचा सातत्याने पाठलाग करून तिचा विनयभंग करीत होता. याबाबतची तक्रार आल्यानंतर मुलचेरा पोलिसांनी भांदवी कलम ३५३ अ, ३५४ ड, ५०४, ५०६ व पोक्सो ११, करीत

१२ अंतर्गत राजू तपण मंडल याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला चंद्रपूरहून अटक केली. त्यानंतर त्याला न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाच्या निर्देशानुसार त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली. घटनेचा अधिक तपास सहाय्यक या पोलिस निरीक्षक अशोक भापकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक सोनाली पाटील या आहेत