🗣️ राज्य सरकारने गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना लागू केली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्यास २ लाख रुपये तर अपंगत्व आल्यास १ लाख रुपयांची आर्थिक मदत मिळणार आहे.
💁♂️ *पहा कोणते आहेत १२ अपघात*
📝 रस्ता किव्वा रेल्वे अपघात, पाण्यात पडून मृत्यू होणे, विषबाधा होणे, विजेचा धक्का लागून मृत्यू होणे, वीज पडून मृत्यू होणे, उंचावरून पडून झालेला अपघात, सर्प चावून मृत्यू होणे, नक्षलवाद्यांकडून झालेला हल्ला,
👌 त्याचबरोबर जनावरांच्या चावण्यामुळे जखमी किव्वा मृत्यू, बाळंतपणातील मृत्यू, दंगल, खून, यासर्व अपघातांसाठी राज्य सरकारकडून सानुग्रह अनुदान देण्यात येणार आहे. तसेच ज्यांच्या नावावर शेत जमीन आहे असे शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकणार आहेत.
👀 परंतु ज्यांच्या नावावर जमीन नाही आणि ज्यांचं नाव सातबारावर सुद्धा नाही, पण ती व्यक्ती शेतकरी कुटुंबातील असेल तर अशा कुटुंबातील कुठल्याही एका व्यक्तीला अर्ज करता येणार आहे. मात्र अर्जदाराची किमान वय १० वर्षे असावे आणि जास्तीत जास्त ७५ वर्ष असावे.
🙏 *आता अपघात होऊन मृत्यू झाल्यास सरकार कडून २ लाख रुपये अनुदान मिळणार आहे* - हि बातमी आपण इतरांना देखील शेअर करा