वीज कोसळून शेतकऱ्याचा मृत्यू

कुरखेडा : लग्नसमारंभाहून परतताना झाडाखाली थांबलेल्या दाम्पत्यासह दोन चिमुकल्यांचा वीज पडून मृत्यू झाल्याच्या घटनेची शाईही वाळली नाही, तोच कुरखेडा तालुक्यातील देऊळगावात शेतीकाम करताना एका शेतकऱ्याचा वीज कोसळून मृत्यू झाला. २५ एप्रिलला ही घटना घडली. ऋषी बुधाजी गावडे (४५, रा. देऊळगाव) असे मृताचे नाव आहे. ते २६ एप्रिलला शेतीकाम करीत होते. यावेळी पिकांत जनावर आले. त्यामुळे त्याला हाकलण्यासाठी ऋषी गावडे हे गेले होते. याचवेळी मेघगर्जना झाली. आकाशात कडाडणारी वीज अंगावर पडल्याने ऋषी गावडे यांचा मृत्यू झाला. देऊळगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात त्यांना तपासून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले. त्यांच्या पश्चात आई, पत्नी व दोन मुले आहेत.