मानव विकास मिशन अंतर्गत या मार्गे बस होती परंतु, आता विद्यार्थ्याचे पेपर झाले आहेत हे कारण देऊन ती बस बंद करण्यात आली आहे .परंतु महाविद्यालय, आय टी आय अजूनही चालू आहेत सदर मार्गावर विद्यार्थ्यांचे पासेस आहेत. परंतु बस बंद केल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. सदर मार्गे एकही बस नाही. या मार्गावर प्रवाशी संख्या पण जास्त आहे. ऐन उन्हाळी हंगामात बस बंद केली गेली करिता बस पूर्ववत सुरू करावी अशी मागणी स्थानिक नागरिक तसेच विद्यार्थ्यांकडून होत आहे .