बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांचा स्मृती दिन संपन्न


गडचिरोली 9 एप्रिल (जिल्हा प्रतिनिधी) रिपब्लिकन पक्षाचे नेते तथा राज्यसभेचे माजी उपाध्यक्ष बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे स्मृती दिना निमीत्त अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या जिल्हा शाखेच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
   शहरातील इंदिरा चौक येथे अखिल भारतीय रिपब्लिकन पक्षाचे केंद्रीय उपाध्यक्ष रोहिदास राऊत यांच्या हस्ते बॅरिस्टर खोब्रागडे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. प्रदेश उपाध्यक्ष प्रि. प्रकाश दुधे, प्रदेश सरचिटणीस प्रा.राजन बोरकर जिल्हाध्यक्ष हंसराज उंदिरवाडे, जिल्हा सरचिटणीस प्रल्हाद रायपुरे, कार्यालयीन सचिव अशोक खोब्रागडे, शहराध्यक्ष अनिल बारसागडे, युवक अध्यक्ष नरेंद्र रायपुरे, सरचिटणीस पुण्यवान सोरटे, तालुका उपाध्यक्ष दादाजी धाकडे, बीआरएसपी जिल्हा प्रभारी राज बन्सोड , बौद्ध महासभेचे सरचिटणीस प्रा. गौतम डांगे, मुन रायपुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.
     यावेळी बोलताना श्री.राऊत यांनी सांगितले की बॅरिस्टर खोब्रागडे हे देशातील दलित आणि मागास वर्गीयांचे खरे सेनानी होते. त्यांनी आयुष्यभर वंचित घटकांसाठी काम केले आणि रिपब्लिकन चळवळ देशभर पोहोचवली. रिपब्लिकन चळवळ मजबूत करून त्यांचे ध्येय धोरण व कार्य पुढे नेण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.
     यावेळी उपस्थित सर्व कार्यकर्त्यांनी दिवंगत नेत्याला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहिली.