माफिया अतिक आणि अशरफची फिल्मी स्टाईलमध्ये हत्या…मीडियाशी बोलत असताना पोलिसांच्या समोर केला गोळ्यांचा वर्षाव…घटना कॅमेऱ्यात कैद




शार्प शूटर्सप्रमाणे गोळ्यांचा वर्षाव झाला, फिदाईनप्रमाणे घटना घडवून आणली


17 पोलीस निलंबित 


व्हिडियो जरूर बघा 

👇👇👇👇👇👇👇👇

https://twitter.com/ANI/status/1647293175780761601?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1647293175780761601%7Ctwgr%5Edda4398a1b3a0bdd6ec1c345863a7242b0102933%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.tarunbharat.net%2FEncyc%2F2023%2F4%2F16%2FAtik-s-murder-live-video.html

  उत्तर प्रदेश:    माफिया अतिक अहमद आणि अशरफ यांना प्रयागराजच्या कोल्विन हॉस्पिटलबाहेर मारण्याचा कट बदमाशांनी आधीच तयार केला होता. अतीक आणि अश्रफ यांना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात आणले जाणार आहे, हे त्यांना माहीत होते, म्हणून ते तिथे मीडियावाले म्हणून उभे राहिले.

विशेष म्हणजे हत्येच्या कटाचा सुगावाही पोलिसांना लागला नाही. हल्लेखोरांनी अतिक आणि अश्रफ यांच्यासोबत असलेल्या पोलिसांना सावरण्याची संधीही दिली नाही आणि हा प्रकार घडवून आणला.

खरं तर गुड्डू मुस्लिम बद्दल…” तो प्रसारमाध्यमांशी एवढं बोलताच सावलीप्रमाणे अतिकच्या मागे आलेल्या शूटरने अगदी दूरवरून त्याच्या डोक्यात पिस्तुलाने गोळी झाडली. गोळीबाराचा आवाज ऐकून अतिकच्या एक पाऊल पुढे जात असलेल्या अश्रफने मागे वळून पाहिले तर त्याला धक्काच बसला. तोपर्यंत आणखी दोन शूटर जवळ आले आणि त्यांनी अश्रफ यांच्यावर समोरून गोळीबार सुरू केला.

अतीकला हातकडी असल्याने त्याला सुटण्याची शक्यता नव्हती. आश्‍चर्याची बाब म्हणजे या संपूर्ण घटनेदरम्यान अतिक आणि अशरफ यांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेले पोलिस स्वतःचे संरक्षण करत राहिले. गोळीबार करणाऱ्यांचे धाडस पाहून ते थरथर कापले. एवढेच नाही तर त्यांनी पलटी मारून नेमबाजांवर एक गोळीही झाडली नाही.

पोलीस अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, अतिक आणि अश्रफ यांची हत्या ज्या पद्धतीने करण्यात आली त्यावरून हे स्पष्ट होते की, फिदाईन पद्धतीने ही घटना घडवून आणण्यासाठी आलेल्या शूटर्सना त्यांच्या लक्ष्याची आणि परिणामाची चांगलीच कल्पना होती. तिघांनीही पळून जाण्याचा कोणताही प्रयत्न केला नाही आणि अतिशय सहजतेने स्वतःला पोलिसांच्या स्वाधीन केले. तिघेही गोळ्या झाडत चार-सहा पावले मागे पडत राहिले.

आतिक आणि अश्रफला मारले जात असल्याचे लक्षात येताच त्याने शरणागती-समर्पण… जय श्री राम… जय श्री राम म्हणत हात वर केले. पोलिसांनीही प्रत्युत्तरादाखल तिघांना जागीच ठार मारण्याचा प्रयत्न केला नाही. या घटनेच्या पुढील तपासात अतिक आणि अश्रफ यांच्या सुरक्षेत तैनात असलेल्या पोलिसांना याचा जाब द्यावा लागणार आहे.

पाप-पुण्य यांचा हिशेब या जन्मी होतो.
प्रयागराजमध्ये माफिया अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांच्या हत्येनंतर राज्य सरकारचे जलशक्ती मंत्री स्वतंत्र देव सिंह यांची पहिली प्रतिक्रिया आली आहे. पाप-पुण्य यांचा हिशोब या जन्मात होतो, असे ट्विट त्यांनी केले.

यूपीमध्ये गुन्हेगारीची उंची: अखिलेश
सपा अध्यक्ष अखिलेश यादव यांनी अतिक अहमदच्या गोळीबारावर जोरदार टीका केली आहे. त्यांनी ट्विट करून लिहिले की, यूपीमध्ये गुन्हेगारी शिगेला पोहोचली आहे आणि गुन्हेगारांचे मनोबल उंचावले आहे. पोलिसांच्या बंदोबस्तात खुलेआम गोळीबार करून कुणाचा बळी जाऊ शकतो, मग सर्वसामान्यांच्या सुरक्षेचे काय? त्यामुळे जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असून, काही लोक जाणीवपूर्वक असे वातावरण निर्माण करत असल्याचे दिसून येत आहे.


अतीक अहमद आणि भाऊ अशरफ यांची गोळ्या झाडून हत्या

उत्तर प्रदेशचे माजी खासदार अतीक अहमद आणि भाऊ अशरफ या दोघांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. अतीक आणि अशरफ हे दोघे राजू पाल हत्येप्रकरणी तुरुंगात होते. याच प्रकरणातील साक्षीदार उमेश पाल यांच्या हत्येप्रकरणी चौकशीसाठी या दोघांना प्रयागराजला आणण्यात आलं होतं.


अतीक आणि अशरफ या दोघांची हत्या कशी झाली यासंदर्भात उत्तर प्रदेश पोलिसांनी माहिती दिलेली नाही. काही वृत्तानुसार, या दोघांना वैद्यकीय चाचणीसाठी नेलं जात असताना हा प्रकार घडला.

अतीक यांचा मुलगा असदला दोन दिवसांपूर्वीच उत्तर प्रदेश पोलिसांच्या स्पेशल टास्क फोर्सने झाशी येथे कथित एन्काऊंटरमध्ये मारलं होतं. असदच्या बरोबरीने गुलाम नावाच्या कथित शूटरलाही या एन्काऊंटरमध्ये मारण्यात आलं होतं. शनिवारी असद आणि गुलाम यांच्यावर अंत्यसंस्कार झाले.


उमेश पाल हत्या प्रकरणात मुख्य आरोपी असलेले 'बाहुबली नेते' अतीक अहमद यांना गुरुवारी कोर्टात हजर करण्यात आलं.


दरम्यान, याच कालावधीत अतीक अहमद यांचा मुलगा असद अहमद याचा झाशीमध्ये एनकाऊंटरमध्ये मृत्यू झाल्याने खळबळ माजली आहे.


सध्या प्रयागराज पोलिसांनी अतीक अहमद यांची चौकशी करण्यासाठी त्यांना साबरमतीहून प्रयागराजला नेलं आहे.


गुन्हेगारी विश्वातून राजकारणात आलेल्या अतीक अहमद यांची प्रतिमा बाहुबली नेता अशी होती आणि ते उमेश पाल प्रकरणाच्याही आधी या ना त्या कारणाने चर्चेत राहिले होते.


प्रयागराजमधल्या एमपी-एमएलए कोर्टाने उमेश पाल अपहरण प्रकरणात अतीक अहमदला दोषी ठरवत जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती. अपहरणातील इतर सात आरोपींची न्यायालयाने मुक्तता केली होती.


अतीक अहमद यांची सुरुवात

अतीक अहमद यांचा जन्म 1962 साली अलाहबादमध्ये (सध्याचं प्रयागराज) झाला होता.


अतीक अहमद यांचे वडील फिरोझ अहमद अलाहबादमध्ये टांगा चालवायचे. निवडणूक प्रतिज्ञापत्रात अतीक यांनी जी माहिती दिली, त्यानुसार त्यांनी मॅट्रिकपर्यंत शिक्षण घेतलंय.

माध्यमांमध्ये आलेल्या रिपोर्टनुसार, 1979 साली अतीक अहमद यांच्यावर पहिल्यांदा हत्येचा खटला दाखल झाला होता. त्यावेळी ते अल्पवयीन होते.


त्यानंतर त्यांच्याविरोधात गुन्हेगारी खटले दाखल होतच राहिले.


1992 साली अलाहबाद पोलिसांनी अतीक अहमद यांच्या कथित गुन्ह्यांची यादीच जाहीर केली होती. त्यांच्याविरोधात उत्तर प्रदेशव्यतिरिक्त बिहारमध्येही हत्या, अपहरण, खंडणीखोरीसारखे चाळीसहून अधिक खटले दाखल होते.


'बाहुबली' प्रतिमेच्या जोरावर राजकारणात यश

अतीक अहमदविरोधात सर्वाधिक खटले हे अलाहाबाद जिल्ह्यात दाखल केले गेले होते.


अत्यंत गंभीर आरोप असले तरी अतीक अहमद राजकारणात यशस्वी होत गेले. त्यांनी 1989 साली पहिल्यांदा अपक्ष म्हणून निवडणूक लढवली आणि विजयी झाले.

त्यांच्या या बाहुबली प्रतिमेमुळेच अलाहबाद शहर (पश्चिम) मतदारसंघातून अनेकदा निवडूनही आले.


अतीक अहमद एकदा अलाहबादमधल्या फूलपूर मतदारसंघातून खासदार म्हणूनही निवडून आले. हा तोच मतदारसंघ आहे, ज्याचं प्रतिनिधीत्व कधीकाळी भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी केलं होतं.


पहिली निवडणूक जिंकल्यानंतर त्यांची जवळीक समाजवादी पक्षासोबत वाढली आणि अतीक अहमद यांनी सपामध्ये प्रवेश केला.


तीन वर्षं सपामध्ये राहिल्यानंतर अतीक 1996 मध्ये अपना दलसोबत गेले.


2002 साली अतीक अहमद यांनी अलाहबाद (पश्चिम) मतदारसंघातून पाचव्यांदा विधानसभा निवडणूक लढवली आणि जिंकले.


आता त्यांना लोकसभेचे वेध लागले होते. म्हणून त्यांनी समाजवादी पक्षाच्या तिकिटावर 2004 साली फूलपूरमधून लोकसभेची निवडणूक लढवली आणि निवडूनही आले.


उतरता काळ

आतापर्यंत सगळं ठीक चाललं होतं.


पण अतीक अहमद यांना सर्वांत मोठा धक्का तेव्हा बसला जेव्हा त्यांच्या आणि त्यांच्या भावावर 2005 साली राजू पाल हत्येप्रकरणी एफआयआर दाखल करण्यात आला.


2007 साली उत्तर प्रदेशची सत्ता बदलली आणि मायावती मुख्यमंत्री बनल्या. सत्ता गेल्यानंतर सपाने अतीक यांना पक्षातून बाहेर काढलं. दुसरीकडे, मायावतींनी अतीकला 'मोस्ट वाँटेड' घोषित केलं.


अतीक अहमदने 2008 साली आत्मसमर्पण केलं आणि 2012 मध्ये त्यांची सुटका झाली. त्यानंतर 2014 साली अतीकने सपाच्या तिकिटावर लोकसभेची निवडणूक लढवली, मात्र त्यांचा पराभव झाला.

त्यानंतर अतीक अहमदना 2019 मध्ये सर्वोच्च न्यायालयच्या आदेशानंतर साबरमती जेलमध्ये पाठविण्यात आलं. त्याआधी ते उत्तर प्रदेशमधील नैनी तुरुंगात होते. अतीक यांच्यावर देवरियामधील एका व्यावसायिकाला तुरुंगात बोलावून धमकी देण्याचा आणि अपहरण करण्याचा खटला दाखल झाला होता.


अतीक अहमद यांच्या पत्नी शाइस्ता परवीन यासुद्धा राजकारणात आहेत. त्यांनी याच वर्षी जानेवारी महिन्यात बहुजन समाज पक्षात प्रवेश केला होता.


उमेश पाल प्रकरण काय होतं? अतीक अहमदचं नाव यात कसं आलं?

पाल (डावीकडे) या प्रकरणातील साक्षीदार होते.


2005 मधील हत्येच्या एका घटनेतील मुख्य साक्षीदार उमेश पाल यांची 24 फेब्रुवारी 2023 ला दिवसाढवळ्या हत्या करण्यात आली.


प्रयागराज पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज शोधल्यानंतर हत्येप्रकरणी माजी खासदार आणि बाहुबली नेता अतीक अहमद यांचा मुलगा असद, 'बॉम्बबाज' गुड्डू मुस्लिम, गुलाम आणि अरबाज यांचा हात असल्याचा दावा केला.

2005 साली उत्तर प्रदेशमध्ये आमदार राजू पाल (उजवीकडे) यांची हत्या झाली होती. उमेश पाल (डावीकडे) या प्रकरणातील साक्षीदार होते.

2005 साली बसपा आमदार राजू पाल यांच्या हत्येनंतर उमेश पाल यांचं नाव चर्चेत आलं होतं. त्यांना राजू पाल हत्येप्रकरणी मुख्य आरोपी बनविण्यात आलेलं.


राजू पाल यांच्या पत्नी पूजा यांनी काही महिन्यांपूर्वी बीबीसीचे सहयोगी अमन द्विवेदी यांना सांगितलेलं की, जेव्हा 2006 साली राजू पाल हत्या प्रकरणाची ट्रायल सुरू झाली, तेव्हा उमेश पाल यांनी आपला शब्द फिरवला.


पूजा पाल यांच्या मते जेव्हा राजू पाल हत्या प्रकरणाचा तपास सीबीआयला सोपविला, तेव्हा सीबीआयने उमेश पालला साक्षीदार बनवलं नाही.


त्यांनी हेसुद्धा सांगितलं की, उमेश पाल आपल्या मोठ्या भावाचा टँकर चालवायचे. 2005 साली ते पोलिसांच्या माध्यमातून राजू पाल प्रकरणी साक्षीदार बनले. पूजा पाल यांनी सांगितले की, राजू पाल यांना हॉस्पिटलमध्येही उमेश पालच घेऊन गेले होते.


पूजा पाल यांनी दिलेल्या माहितीनुसार उमेश पाल 2006 पासून 2012 पर्यंत बसपामध्ये होते आणि त्यानंतर समाजवादी पक्षात सहभागी झाले.


2022 विधानसभा निवडणुकीच्या वेळी उमेश पाल भाजपमध्ये सहभागी झाली होते. त्यांना प्रयागराजमधल्या फाफामऊ विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्याची इच्छा होती.


राजू पाल हत्येनंतर उमेश पाल अतीक अहमद यांच्या निशाण्यावर आल्याचं पूजा पाल यांनी म्हटलं.


प्रॉपर्टीचे वाद आणि राजकारणामुळे उमेश पाल यांचं अनेक लोकांसोबत वैमनस्य होतं.

-०-