कारचा नियंत्रण सुटल्याने दोन ते तीन पलटी खाऊन दोन महीला ठार


दिनेश बनकर कार्यकारी संपादक 

#khabardarmaharashtr#onlinenewsportal#social#political#education#crime
एटापल्ली ;- चामोर्शी जवळ चारचाकी वाहनाच्या भीषण अपघातात एटापल्ली तालुक्यातील बिडरी येथील व अहेरी तालुक्यातील पेरमिली येथील असे एकूण दोघांचा मृत्यू झाल्याची घटना दिनांक १८/४२०२३ रोजी रात्र ९ वाजता घडली अपघात इतका भिषण होता की चारचाकी वाहनाचा चेंदा मेंदा झालं


सविस्तर वृत्त या प्रमाणे आहे की हेमंत डोनाडकर ग्रामसेवक हे आपल्या चारचाकी वाहन MH 33 AC 7878 या क्रमांकाच्या वाहनाने गडचिरोल्ली येथे आपल्या पत्नीला हॉस्पिटलला घेऊन जात असतांना अचानक गाडीवरील नियंत्रण सुटल्याने चारचाकी वाहन दोन ते तीन पलटी खाऊन रोडाच्या बाजूला झाली यात हेमंत डोनाडकर ग्रामसेवक यांची आई व सासूचा मृत्यू झाला व त्यांची पत्नी कोमात गेली आहे अशी आपल्याकडे प्राथमिक माहिती आहे