जलकुंभाजवळ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा बौद्ध समाज कोअर कमेटी चे मुख्य अधिकार्यांना निवेदन

 
देसाईगंज : शहरात मुस्लिम कब्रस्थान नजिक असलेल्या बायपास रस्त्यालगत असलेल्या जलकुंभानजिक पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करुन द्यावि या आशयाचे निवेदन बौद्ध समाज कोअर कमेटी च्या वतिनेआज देसाईगंज चे मुख्यअधिकारी यांना देण्यात आले देसाईगंज येथिल मुस्लिम कब्रस्थान लगतच बौद्ध समाजाचीही स्मशानभुमी आहे त्याच बरोबर सदर रस्ता हा देसाईगंज शहराचा मुख्य बायपास रस्ता असल्याने या रत्यावर सतत वर्दळ राहते दोन्ही समाजाची अंत्यविधी सोपस्कार कार्य या जलकुंभालगत होत असल्याने आवागमन करणार्या लोकांना पिण्याच्या पाण्याची सोय पुरविणे अत्यावश्यक असल्याने सदर जलकुंभाजवळ पिण्याच्या पाण्यासाठी नळ जोळणी करुन शेड ची उभारणी करुण द्यावी या आशयाचे निवेदन देण्यात आले न प द्वारे वरिष्ठ लिपिक महेश गेडाम यांनी स्विकारले या प्रसंगी बौद्ध समाज कोअर कमेटी चे मुख्य सल्लागार विजय बंन्सोड डाकरामजी वाघमारे प्रकाश सांगोळे भिमराव नगराळे हंसराज लांडगे नरेन्द्र गजपुरे भिमराव ठवरे पंकज रामटेके यांचेसह नागरिक उपस्थित होते