संघटन महामंञी रविन्द्रभाऊ ओलालवार यांचा सशक्तिकेंद्र निहाय प्रवास
स्थानिक लांझेडा - इंदिरानगर येथे माजी न.प.उपाध्यक्ष अनिल भाऊ कुनघाडकर यांच्या निवासस्थानी बैठक संपन्न
दिं 10/04/2023
गडचिरोली:लांझेडा - इंदिरानगर येथे बुथ सशक्तिकरण अभियान आढाव्याच्या संदर्भात इंदिरानगर येथे संगठनात्मक बैठक स्थानिक अनिलभाऊ कुनघाडकर यांच्या निवासस्थानी घेतली. या प्रसंगी जिल्हा संघटन महामंञी रविंद्रभाऊ ओलालवार यांच्या अध्यक्षतेखाली सुरवातीला बुथ सशक्तिकरण अभियानाच्या संदर्भात माहिती दिली.त्यानंतर स्थानिक पातळीवर आजपर्यत झालेल्या बुथ रचनेचा आढावा घेतला.शहरातील उर्वरीत बुथ रचना लवकरात लवकर पुर्ण करणे,सामाजिक न्याय सप्ताह राबविणे, सरल अँप प्रक्षिशण,धन्यवाद मोदिजी पञे,फ्रेंड ऑफ बिजेपी अशा विविध संघटनात्मक विषयावर विस्तृत मार्गदर्शन केले.
30 एप्रिल रोजी होणाऱ्या शंभरव्या मन कि बात कार्यक्रमाचे उत्तम आयोजन करण्यासंदर्भात सर्वानी बूथनिहाय नियोजन करावे असी सुचनाही बैठकिदरम्यान केली.
या बैठकीला प्रमुख उपस्थित संघटन महामंञी रविंद्रभाऊ ओलालवार, शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे,शहर महामंञी विनोदभाऊ देवोजवार , माजी न.प.अध्यक्ष अनिलभाऊ कुनघाडकर,महामंञी भाजयुमो गडचिरोली शहर हर्षल गेडाम,भाजयुमो शहर सचिव सुरज गुंडमवार.
बूथ प्रमुख मंगेश वैरागडे,,बूथ प्रमुख निलेश आञाम,बुथ प्रमुख,बूथ प्रमुख देवेद्र कुनघाडकर, वैभव बोराटे,बूथ प्रमुख नरेद्रजी हजारे, बूथ प्रमूख द्रेवेद्र नैताम,आदित्य बनकर,फिरोज पठाण, गणेश मल्लेलवार,अक्षय इंनमवार व इतर कार्यकरते बहुसंख्येने उपस्थित.