सावली: वाघाचा हमला ही नित्याचीच बाब आहे. लोकांवर वाघ मोठ्या प्रमाणात हमले करत आहेत. असा एकही दिवस जात नाही की, वाघाने हमला केला नाही म्हणून, चंद्रपूर जिल्ह्यातील कुठे ना कुठे एकतरी घटना घडत असते. याच महिन्यात बोरमाळा येथील ४ वर्षाचा हर्षल संजय कारमेगे या बालकाला अंगणातून त्याच्या आई देखत उचलून नेले त्यानंतर चकवीरखल येथील मंदा एकनाथ सिडाम वय ५३ वर्ष ही रात्रोच्या सुमारास घराच्या अंगणात खाटेवर झोपली असताना नरभक्षक वाघाने रात्री १ ते २ च्या सुमारास खाटेवरून उचलून नेवुन नरडीचा घोट घेतल्याने महीलेचा मृत झाला. अशा अनेक घटना ताज्या असतांना सावली तालुक्यातील वाघोली येथील ममता हरिश्चंद्र बोदलकर नामक महिला वय ७० वर्षे आज दुपारच्या सुमारास गावाशेजारी असलेल्या स्वतःच्या शेतामध्ये मक्का पिकाची काढणी करण्यासाठी गेलेल्या महिलेवर अचानक पट्टेदार बाघाने हमला केला व त्यातच त्यांचा करून अंत झाला. ममताच्या अंगावर हमाला करण्यापूर्वी शेजारील असलेल्या महिलेवर वाघाने हमला करण्याचा प्रयत्न केला परंतु त्या महिलेला हातात विळा असल्याने वाघ माघारी फिरला परंतु वाघाच्या समोर ममता निशस्त्र दिसल्याने वाघाने तिच्यावर हमला करून दिला ठार केले.तिच्या पश्चात पती, दोन मुली आणि एक मुलगा असा आप्त परिवार आहे.
आजपर्यंत चंद्रपूर जिल्ह्यात ५३ बळी वाघाच्या हल्यात गेले आहेत त्यापैकी सावली तालुक्यात २० जणांचा वाघाने बळी घेतलेला असून ममताचा २१ वा बळी पडलेला आहे. चंद्रपूर जिल्हयाचा विचार करता एक तृतीयांश बळी एका सावली तालुक्यातील गेले आहेत ही गांभीर्यची बाब आहे मात्र याकडे दुर्लक्ष होत आहे.
महाराष्ट्राचे वनमंत्री चंद्रपूर जिल्ह्यातील असतांना मात्र वाघाचे बंदोबस्त करण्यासाठी कोणत्याच प्रकारची ठोस कार्यवाही करतांना दिसत नाही ही फार मोठी शोकांतिका आहे.
वनमंत्र्यांच्या जिल्ह्यात वन्य प्राण्यापासुन नागरिकांना धोका वनमंत्री सुधीरभाऊ मुनगंटीवार याकडे लक्ष देतील का असा प्रश्न संपूर्ण जिल्ह्यातील नागरिक प्रश्न विंचारात आहेत.
.