चंद्रपूर : जिल्ह्यातील काही भागांमध्ये वाघाची दहशत आहे. यामुळे शेतात काम करणेही शेतकऱ्यांना कठीण झाले आहे. दरम्यान, भद्रावती तालुक्यातील वायगाव (कुरेकार) येथील एका शेतकऱ्याने शेतशिवारात चरण्यासाठी सोडलेल्या पाच बैलांपैकी चार परत आले, तर एका बैलाला वाघाने ठार केल्याची घटना शनिवारी रात्री उघडकीस आली. खरीपूर्व हंगामापूर्वीच बैलाला वाघाने ठार केल्याने शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे.
भद्रावती तालुक्यातील इरई धरणाच्या बाधित क्षेत्रातील वायगाव कुरेकार येथील शेतकरी पंडित कुरेकार यांनी आपल्या मालकीचे पाच बैल शुक्रवारी सकाळी शेतशिवारात चरण्यासाठी सोडले होते. मात्र वाघाने ठार केले. यामध्ये त्यांचे मोठे नुकसान झाले. त्यामुळे नुकसान भरपाईची मागणी करण्यात आली आहे.