गडचिरोली पोलीस व नक्षल चकमकीत एक जहाल नक्षली ठारगडचिरोली:मौजा तोडगट्टा येथील जनआंदोलनासाठी नक्षलवाद्यांनी नागरीकांना बळजबरी सहभागी होण्यास भाग पाडले आहे असे नक्षवाद्यांनी नुकत्याच टाकलेल्या पत्रकातुन सिध्द होते. हैराण झालेल्या नागरीकांना आणखी फुस लावुन आंदोलन कायम ठेवण्याच्या हेतुने तसेच पोलीसांव्दारे राबविण्यात येणा-या नक्षलविरोधी अभियान दरम्यान मोठा घातपात करण्याची योजना नक्षलवाद्यांकडुन आखली जात आहे अशा खात्रीशिर माहिती वरुन गडचिरोली पोलीस दलाच्या विशेष अभियान पथकांच्या जवानांनी त्या भागात शोध अभियान राबविले असता, आज दिनांक ०१/०४/२०२३ च्या सकाळी १०:०० वाजेच्या सुमारास उपविभाग हेडरी अंतर्गत येणाऱ्या गट्टा (जां.) हद्दीतील मौजा हिक्केर जंगल परिसरातील पहाडीवर सुमारे ६० ते ७० नक्षलवाद्यांनी जवानांना जीवे ठार मारण्याच्या व हत्यार लुटण्याच्या उद्देशाने बीजीएल व इतर दारुगोळ्याच्या साह्याने तीव्र स्वरुपात अंदाधुंद गोळीबार केला. त्यावेळी पोलीसांनी नक्षलवाद्यांना त्यांच्या हातातील शस्त्र खाली ठेवुन शरण येणे बाबत आवाहन केले असता, नक्षलवाद्यांनी शरण न येता पोलीसांवर आणखी जोरदार हल्ला चढवला. जवानांनी प्रत्युत्तरादाखल व स्वरक्षणासाठी नक्षलवादयांच्या दिशेने गोळीबार केला. सदरची चकमक ही सुमारे ३० ते ४५ मिनीटे चालु होती. पोलीसांचा वाढता दबाव पाहून नक्षलवाद्यांनी घनदाट जंगलाचा फायदा घेत घटनास्थळावरून पळ काढला.चकमकीनंतर सदर जंगल परिसरात जवानांनी शोध अभियान राबविले असता, घटनास्थळावर ०१ पुरुष नक्षल मृतदेह आढळुन आले. मृत नक्षलीची ओळख पटली असून त्याचे नाव समीर ऊर्फ साधु लिंगा मोहंदा, वय ३१ वर्षे, रा. तुमरकोडी, पोमकें कोठी, तह. भामरागड जि. गडचिरोली येथील रहीवासी होता. त्याच्यावर आजपावेतो २ चकमक व २ इतर असे ४ गुन्हे दाखल असून, त्यामध्ये पोस्टे भामरागड येथे सन - २०१८ साली पोलीसांना जिवे मारण्यासाठी ॲम्बुश लावणे यासाठी देखील गुन्हा दाखल आहे. सदर नक्षल सन २०१४-१५ साली चातगाव दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन २०१७ साली प्लाटुन क्र. ७ मध्ये भास्कर चा सुरक्षा गार्ड होता. तसेच सन २०१८ साली कंपनी ४ मध्ये कार्यरत होता व त्यानंतर कंपनी क्रमांक १० मध्ये कार्यरत असल्याची प्राथमिक माहिती प्राप्त झाली आहे. त्याच्यावर महाराष्ट्र शासनाने २ लाख रुपयाचे बक्षीस जाहीर केले होते.


घटनास्थळावर ०१ नग देशी बनावटीची रायफल, ०१ नग भरमार रायफल, १ नग ३०३ रायफल, ब्लास्टींगचे साहित्य, एसएलआर च्या २ मॅगझिन व ३० राऊंड्स, ८ एम. एम. रायफलचे ३ राउंड्स, १२ बोर चे ४ राउंड्स, २ पिट्ट, भरपुर प्रमाणात नक्षल लिखाण साहित्य, १ सॅमसंग कंपनीचा टॅब्लेट, १ रेडिओ, रोख रक्कम रुपये ३८,१२०/-, नक्षल कपडे, व ईतर नक्षल साहित्य हस्तगत करण्यात पोलीस दलास यश आले आहे. सदर जंगल परिसरात सी-६० पथकांच्या जवानांचे नक्षलविरोधी अभियान आणखी सुरु असुन, जंगल परिसरात मोठ्या प्रमाणात शोध मोहिम राबविण्यात येत आहे. गडचिरोली पोलीस दलाकडुन गुन्हा नोंद करण्यासंबंधीची प्रक्रिया सुरु असुन पुढील तपास गडचिरोली पोलीस दल करत आहे.


सदर अभियान मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (अभियान) अनुज तारे सा., मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता सा. व मा. अपर पोलीस अधीक्षक (अहेरी) श्री. यत्तिश देशमुख सा. यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले असून, सी-६० कमांडोच्या या शौर्यपुर्ण कामगिरीचे मा. पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल साो. यांनी कौतुक केले. तसेच नक्षलविरोधी अभियान आणखी तीव्र करण्याचे संकेत दिले असून सर्व नक्षलवाद्यांना आत्मसमर्पण होऊन आपले जिवनमान उंचाविण्याचे आवाहन केले आहे.


Encounter between Gadchiroli Police and Naxalites: One Naxalite neutralized during the encounter.


Gadchiroli :There was credible intelligence that, Naxalites are threatening and misguiding people of Todgatta area to intensify ongoing protest against developmental activities and establishment of Police camps. People participating in this protest were helpless due to the continuous threat by Naxalites. Gadchiroli Police had launched an anti-Naxal operation in Hikker jungle area under AOP Gatta (Ja.) in Hedri Sub-division.

Today at around 11:00 am, about 60 to 70 Naxalites started indiscriminate fire on

C-60 parties with the intention of killing security personnel and taking away their weapons

and ammunition. Police parties made an appeal to the Naxalites to surrender but they did

not surrender. In self-defense police started controlled firing in the direction of Naxals.

Encounter continued for 30 to 45 minutes. Sensing increased police presence Naxalites

fled away by taking the advantage of thick forest.

After the encounter, search operation was conducted were police got one dead body of male Naxal named Sameer @ Sadhu Linga Mohanda, age 31 yrs., R/o, Tumarkodi, AOP Kothi, Tah. Bhamaragad, dist. Gadchiroli. He has four crimes registered against him. He was member of Chatgaon LOS. He was made member of Coy. 4 in 2018. He is carrying a reward of Rupees 2 lakhs.

Along with above mentioned Naxal dead body police has recovered one .303 rifle, one country made rifle, one Bharmar rifle, 2 SLR magazines & 30 rounds, 3 rounds of 8 mm rifle, 4 rounds of 12 bore, 2 pittus, naxal literature, Tablet of Samsung company, 1 Radio, cash Rs. 38,120/-, Naxal uniforms and other Naxal belongings. Search operation is still going on and crime registration is also going on.

The above successful operation was conducted under the able guidance of Shri Neelotpal, Supdt. of Police, Gadchiroli, Shri Anuj Tare, Addl. Supdt. of Police (Ops.), Gadchiroli, Shri Kumar Chintha, Addl. Supdt. of Police (Admin.) Gadchiroli, Shri Yatish Deshmukh, Addl. Supdt. of Police, Aheri. Shri. Neelotpal, Superintendent of Police, Gadchiroli has appreciated the efforts and bravery of the C-60 commandos and vowed to intensify the anti-naxal operations against the Left-wing extremists.