पुरुषांना पोटगीचा अधिकार नाही काय?

चंद्रपूर : पती-पत्नी संसाराची दोन चाके आहेत. एक जरी निखळला की संसाराचा गाडा जमिनीत रुततो व संसाराला खीळ बसतो. दोष पत्नीचा असो वा पतीचा पत्नी कमावती असो वा नसो. पत्नीच्या मागणीप्रमाणे तिला पोटगी देण्यास न्यायालय सांगतात. कायदा पती पत्नी दोघांनाही समान असावा, पत्नी कमावती असेल व पुरुष कमावता नसल्यास किंवा कमावण्यासाठी असमर्थ असल्यास त्याला पोटगीचा अधिकार नाही काय, असा प्रश्न भारतीय परिवार बचाव संघटनेकडून आयोजित चर्चासत्रात उपस्थित केला.

यावेळी हुंडाबळी ४९८ (अ), गृह हिंसाचार २००५, पोटगी, वैवाहिक बलात्कार, कस्टडी (मुलांचा ताबा) तलाक, कार्यस्थळी उत्पिडन, मिटू यांसारख्या विषयावर चर्चा दीर्घ झाली. • यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. नंदकिशोर मैंदळकर, कायदेविषयक सल्लागार सारिका संदुरकर, अॅड. नितीन घाटकीने, सुदर्शन नैताम, मोहन मोहन जिवतोडे, वसंता भलमे, प्रदीप गोविंदवार, प्रशांत मडावी, भावना रोडे, • किरण चौधरी (गडचिरोली), रेखा चौधरी, सचिन बरबटकर, गंगाधर गुरनुले आदी उपस्थित होते. एक दिवशीय चर्चासत्रात अनेक पत्नी पीडितांनी हजेरी लावत आपल्या व्यथा मांडल्या.

पुरुषांनो पत्नीकडून अत्याचार होत असल्यास रीतसर भरोसा सेलला तक्रार करावी, अत्याचाराच्या हुंडाबळी ४९८ (अ) वैवाहिक बलात्काराच्या खोट्या तक्रारी देऊन पत्नी पुरुषाला खोट्या केसेस मध्ये मोठ्या प्रमाणात अडकित आहेत यावर चर्चा केली.