सोमनाथ देवराम चाळचूक असे या सहाय्यक फौजदाराचे नाव असून ते कोल्हापूर येथील जयसिंगपूर पोलीस ठाण्यात सहायक फौजदार म्हणून कार्यरत आहेत. काही दिवसांपूर्वी त्यांनी सोशल मीडियात ‘ 84 लाख जीवांमध्ये फक्त माणूस म्हणून पैसे कमवतो पण कुठलाच जीव उपाशी राहत नाही आणि माणूस पैसे कमवूनही त्याचे पोट कधीच भरत नाही ‘ अशी पोस्ट केलेली होती . सोशल मीडियावर त्यांच्या पोस्टचे मोठ्या प्रमाणात कौतुक झाले मात्र त्यानंतर त्यांना लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले.
तक्रारदार व्यक्ती यांनी एका फायनान्स कंपनीकडून ओमनी वाहन विकत घेतलेले होते त्यानंतर त्यांनी ते वाहन त्यांच्या एका मित्राला विकले मात्र मित्राने देखील हप्ता भरता आला नाही म्हणून ते वाहन परस्पर इतरत्र विकले त्यामुळे तक्रारदार व्यक्ती यांनी पोलिसांकडे धाव घेत वाहन परत मिळावे म्हणून अर्ज केलेला होता. तुझे वाहन परत तुला मिळून देतो असे सांगत सोमनाथ यांनी त्याला पंधरा हजार रुपये लाचेची मागणी केलेली होती.
तक्रारदार व्यक्ती यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या टोल फ्री नंबर 1064 वर संपर्क केला आणि तक्रारीत तथ्य असल्याचे आढळून आल्यानंतर सापळा रचण्यात आला अन त्यानंतर सोशल मीडियावर तत्त्वज्ञान सांगणाऱ्या चाळचूक साहेबांना पंधरा हजार रुपयाची लाच घेताना पकडण्यात आले त्यामुळे या निमित्ताने त्यांच्या या पोस्टची देखील सोशल मीडियात जोरदार चर्चा सुरू आहे