अन् तब्बल 36 शेळ्या ठार



गडचांदूर (वा.). कोरपना तालुक्यातील नांदा बिबी गडचांदूर परिसरात दुपारच्या नंतर अचानक वातावरणात बदल झाला. दरम्यान विजेच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. यावेळी गडचांदूर येथील जब्बार कुरेशी हे बिबी येथील स्वप्निल टोंगे यांच्या शेतशिवारात आपल्या मेंढ्या चारत होते. अचानकपणे मेंढ्यांच्या कळपावरती वीज कोसळल्याने 36 मेंढ्या जागीच ठार झाल्या व शिल्लक पैकी सहा ते आठ मेंढ्यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांचीही प्रकृती चिंताजनक आहे. ही घटना सोमवारी दुपारच्या सुमारास घडली.

अतोनात नुकसान झाले आहे. घटनेची माहिती वनविभाग व महसूल विभागाला देण्यात आली. परिसराचे पटवारी जाधव यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. अचानकपणे ओढावलेल्या या अस्मानी संकटामुळे शेतकऱ्यांचे फारच मोठे नुकसान झाले असून शासनाच्या वतीने त्यांना लवकरात लवकर आर्थिक मोबदला देण्यात यावा, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी व परिसरातील मेढपाळ व शेतकरी जब्बार कुरेशी यांचे नागरिकांनी केली आहे.