सरपंचासह ग्रामसेवक व सरपंच पतीला 35 हजार हजार रुपयाची लाच घेताना अटक


गोंदिया,दि.21ः तालुक्यातील सेजगाव खुर्द ग्रामपंचायतीच्या सरपंचासह ग्रामसेवक व सरपंच पतीला 35 हजार हजार रुपयाची लाच घेतांना लाचलूूचपत विभागाच्या चमूने सापळा रचून अटक केली.ही कारवाई 20 एप्रिल रोजी करण्यात आली.यातील तक्रारदार कंत्राटदार असून केलेल्या कामाचे देयके काढून देण्याकरीता मागणी केली असता कंत्राटदाराकडे लाचेची मागणी करण्यात आली.कंत्राटदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने लाचलुचपत विभागाकडे तक्रार नोंंदवली.त्या तक्रारीनुसार सापळा रचून कारवाई करण्यात आली.यात सेजगाव खुर्द ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवक सौ. प्रीती प्रशांत साखरे वय 36 वर्ष,रा. चंद्रशेखर वॉर्ड, गोंदिया,गट-ग्रामपंचायत सेजगाव खुर्दच्या सरपंच सौ.अर्चना योगेश्वर कन्सरे वय 28 व
गट ग्रामपंचायत सेजगाव खुर्दतंर्गत येत असलेल्या कोहका निवासी योगेश्वर भैय्यालाल कन्सरे वय 36 (सरपंच पती, खाजगी इसम) यांना 35 हजाराची लाच घेतांना अटक करण्यात आली.तक्रारदार हे बांधकाम मटेरियल सप्लायर असून त्यांनी गट ग्रामपंचायत सेजगाव खुर्द अंतर्गत प्राप्त टेंडर नुसार जण सुविधा योजने अंतर्गत सेजगाव स्मशानभूमी कडे जाणाऱ्या रस्त्याचा बांधकामाकरिता लागणारे 2,71,857 रुपयांचे साहित्य पुरवठा केले आहे.या पुरवठा केलेल्या बांधकाम साहित्याची बिले मंजूर करून त्यांना 2,71,857 रुपयांचे धनादेश दिल्याचा मोबदला म्हणून आरोपी ग्रामसेविका यांनी 13,000 रुपये व सरपंच व आरोपी क्रमांक सरपंच पती (खाजगी इसम)यांनी 22,000 रुपये पंचासमक्ष तक्रारदाराकडून लाच रकमेची मागणी करून ग्रामसेवक व सरपंच यांनी एकूण लाच रक्कम 35,000 रुपये खाजगी इसम सरपंच पती याच्याकडे देण्यास सांगून लाच रक्कम प्राप्त करण्याचा प्रयत्न केला.दिनांक 20/04/2023 रोजी सापळा कार्यवाही दरम्यान आरोपी क्रमांक सरपंच पती (खाजगी इसम) याने तक्रारदाराकडुन श्री द्वारिका हॉटेल, कुडवा नाका गोंदिया येथे लाच रक्कम 35,000 रुपये पंचासमक्ष स्वीकारली तिन्ही आरोपीना ताब्यात घेण्यात आले असून त्यांच्या विरुद्ध पोलीस स्टेशन – रामनगर येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.