देऊळगाव: मोटारसायकलने घेतला पेट, 3 जण जखमीगडचिरोली:- फोर व्हिलर आणि टयुव्हीलर दोघामधे देऊळगाव जवळच ( पंट्रोल पंप ) जवळच भिषण अपघात घडला. टुव्हिलर वाले तिघे जन जखमी झाले असुन फोर व्हीलर रस्ताच्या कडेला गेली. व सदर गाडीचा पूढील भाग चेदामेंदा झाला. सविस्तर वृत्त असे की फोर व्हिलर गाडी नंबर M H _ 32 AH . 6 677 क्रेटा हि वर्धा वरून गडचिरोली जात होती तर टु व्हिलर हि गडचिरोली वरून आरमोरी कडे जात होती. आरमोरी पोलिस स्टेशन अंतर्गत देऊळगांव जवळ ( पेट्रोल पम्प ) जवळ या दोघाचा भिषण अपघात घडला. टु व्हिलर मधे तिघे जन बसले होते. त्यांच्या मागुन एक फोर व्हिलर येत होती. त्यामुळे वर्धा वाल्या गाडी मालकाने टु व्हिलर वाल्यांना वाचवितव्याच्या नांदात भिषण अपघात घडला.

 यात सोमेश्वर बावणे  वैरागड , गणेश नवघरे गणेशपुर (शिर्शी) व एक तिसरा व्यक्ती त्याचे नाव कळले नाही. तो गंभीर जखमी आहे. तर गणेश नवघरे यांच्या पायाला जबर मारहान आहे. मात्र फोर व्हिलर वाले सुखरूप असुन त्यांची गाडी रस्त्याच्या कडेला गेल्यामुळे सदर गाडीचा पुढील भाग चेंदामेंदा झाला. महत्वाची बाब अशी की टु व्हिलर गाडीने अक्षरश्या पेट घेवून गाडी खाक झाली. मात्र तिघेही गाडीवरून जिकडे तिकडे पळल्यामुळे ते बचावले देऊळगाव वासीयांनी लगेच जखमीचा झाडात नेले. रिपब्लिकन पार्टी चे जिल्हा अध्यक्ष यांनी पोलिस स्टेशन आरमोरी व अम्ब्युलन्स वाल्यांना फोन केला. आरमोरी पोलीस स्टेशनचे पोलीस घटनास्थळी लवकरच पोहचले. जखमीना सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे पोहचविण्यात आले. आरमोरी पो. स्टेशनचे पोलीस अधिक तपास करीत असुन बघ्याची तुफान गर्दी जमली होती.