दिनेश बनकर कार्यकारी संपादक सुपर फास्ट बातमी
गडचिरोली
डॉ.
बाबासाहेब आंबेडकर संशोधन केंद्र संभाजीनगर औरंगाबाद येथे दिनांक 29-4-2023 ला स. ११.०० वा राज्यस्तरीय पुरस्कार सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. त्याकरीता गडचिरोली जिल्हा येथील आरमोरी तालुक्यातील गडचिरोली पोलीस दलात कार्यरत असलेले सहा.पोलिस उपनिरीक्षक सागर मुल्लेवार यांना गडचिरोली पोलीस दलात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल भारत सरकार तर्फे मा.राष्ट्रपती पोलीस शौर्यपदक 15 आगस्ट 2022 रोजी जाहीर झालेले आहे.
याच जन हितार्थ कार्याची दखल घेत, साहित्यधारा बहुउद्देशीय सेवाभावी संस्था औरंगाबाद यांच्या वतीने दिला जाणारा समाज भूषण पुरस्कार यांना जाहीर करण्यात आलेला आहे येणाऱ्या बुद्ध जयंतीच्या निमित्याने सहा.पोलिस उपनिरीक्षक सागर मुल्लेवार गडचिरोली यांना "समाजभुषण पुरस्कार" प्रदान करून गौरविण्यात येणार आहे….
सागर मुलेवार यांना समाज भूषण पुरस्कार जाहीर झाल्याने त्यांच्या मित्र
मंडळींमध्ये आणि त्यांच्या गावामधे सागर मुलेवार यांच्याप्रती आनंदाचे वातावरण पसरल्याचे दिसतआहे.
….