ग्रामपंचायत चामोर्शी (माल)यांच्याकडून समस्त जनतेला डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा..2023

अन्यायाच्या विरोधात लढण्याची आमच्यात शक्ती निर्माण करून देणाऱ्या, संपूर्ण स्त्री जातीला न् मागता सर्व क्षेत्रातील समान संधी त्यांच्या ओटीत टाकणाऱ्या तसेच प्रसूती रजेपासून ते वृध्दापकाळातील पेंशन उपलब्ध करून देणाऱ्या , महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची आज १३२ वी जयंती आहे, त्यानिमित्त आपणास कोटी कोटी शुभेच्छा, बाबासाहेबांना विनम्र अभिवादन 🌹🌹🌹🌹🌹🙏🙏🙏 बाबासाहेब तुम्ही होते म्हणून आम्ही आहोत.....!!!✊✊✊



जिथे प्रकाशाच्या वाटा बंद होत्या
त्या अंधारातील "सूर्य" म्हणजे माझा भिमराव....

पाण्याच्या थेंबासाठी तडफडणा-या जीवांची
तहान भागवणारा "पाऊस" म्हणजे माझा भिमराव...

कैक वार झेलून असंख्य वादळांशी लढणारा 
बलाढ्य "पहाड" म्हणजे माझा भिमराव...

लिहिता लिहिता लेखणीनेही थिटे पडावे
असा अथांग "ज्ञानसागर" म्हणजे माझा भिमराव....

गुलामगिरीच्या साखळदंडातून मुक्त करून 
माणसाला माणुसकी दाखवणारा "मार्ग" म्हणजे माझा भिमराव!!

शब्दांत न मावणा-या महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🌹🙏
🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️🏵️

🙏वेळेवर टॅक्स भरा आणि ग्रामपंचायतला सहकार्य करा 🙏