वैरागड : दोन लेकरांची आई असलेली महिला प्रियकरासोबत पसार झाली. ही घटना आरमोरी तालुक्यातील एका गावात ३१ मार्चला घडली. याबाबत धानोरा पोलिस ठाण्यात महिलेसह दोन मुले हरवल्याची तक्रार पतीने दिली.
पोलिसांच्या माहितीनुसार, आरमोरी तालुक्यातील एका गावातील ३० वर्षीय तरुणाचा नागभीड तालुक्यातील २७ वर्षीय तरुणीशी सहा वर्षांपूर्वी विवाह झाला होता. लग्नानंतर तरुण चंद्रपूर जिल्ह्यातील एका गावात किरायाने घर घेऊन राहतो. त्यास लग्नानंतर दोन मुले झाली. मुलगा अडीच वर्षांचा तर मुलगी पाच वर्षांची आहे. दरम्यान, ३१ मार्चला
महिला आपल्या लहान मुलाचा भात आणण्यासाठी म्हणून अंगणवाडीत गेली; पण पुन्हा घरी परतलीच नाही. सर्वत्र शोध घेऊनही तीआढळली नाही एका अनोळखी व्यक्तीच्या दुचाकीवरून जाताना लोकांनी पाहिले. त्यानंतर पतीने धानोरा ठाणे गाठून
दोन मुले व पत्नी हरवल्याची तक्रार नोंदवली. या घटनेने लेकरांसह गेल्याचे गावात एकच खळबळ उडाली आहे.
सौजन्य: लोकमत