त्रिमूर्ती बुद्धविहारात भारतरत्न डाँ,आंबेडकर यांची 132 वी जयंती जल्लोषात
डाँ, संजय सोळंके यांच्या हस्ते झाले पंचशील ध्वजारोहण

भोजनदानाने झाला समारोप


राजेंद्र बागडे 
नागपूर विभागीय प्रतिनिधी ता.15
      मोवाड येथील डाँ,आंबेडकर वॉर्ड क्रमांक पाच येथे त्रिमूर्ती बुद्धविहारात डाँ, बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जल्लोषात साजरी करण्यात आली. 132 वा जयंती सोहळा निमित्ताने डाँ, संजय सोळंके यांच्या हस्ते पंचशील ध्वजारोहन करण्यात आले. उपस्थित मान्यवरानी शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, सामाजिक क्रांतीचे अग्रदूत महात्मा जोतिबा फुले,भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वभुषण भारतरत्न डाँ, बाबासाहेब आंबेडकर अण्णाभाऊ साठे, लहुजी सावळे, यांच्या प्रतिमेचे पूजन करून माल्यार्पण करण्यात आले. बुद्ध वंदना घेऊन डाँ, बाबासाहेब आंबेडकर यांच्या जन्मदिनी केक कापण्यात आला. मान्यवरानी डाँ, बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवन शैलीवर मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष सुरेश खसारे, ईस्माईल बारूदवाले, डाँ, संजय सोळंके, डाँ, सुधीर साठोने, माजी उपाध्यक्ष रवि वैद्य, दीपक बेले, उत्तम दारोकर, वासुदेव बनाईत, नामदेव वाड़बुद्धे, रऊफ दिवान, योगेश मालपे, याची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजक त्रिमूर्ती बुद्धविहार पंचकमेटीचे अध्यक्ष पत्रकार राजेंद्र बागडे, उपाध्यक्ष मधुकर बागडे, कोषाध्यक्ष विजय दुपारे, सचिव पुरुषोत्तम बागडे, कार्यक्रम संघटक यशवंत बागडे, भीमआर्मीचे नरखेड काटोल विधानसभा प्रमुख वसंत पाटील, रामेश्वर निकोशे, सीताराम सहारे, अशोक बागडे, विजय गजभिये,भीमराव कठाने, दिलीप बनसोड, जगदीश डाहाट, चांगदेव कठाने, सुभाष खोब्रागडे,सचिन ढोके, सिद्धार्थ बागडे, राहुल बागडे,शुभम गजभिये, त्रिमूर्ती महिला मंडळाचे सीमा बागडे, भीमकला बागडे, अनामिका निकोशे, सारिका गजभिये, शुभांगी बागडे, सुशीला कंठाने, शालू गजभिये, ममता बागडे, मंदा बागडे, प्रेमीला बनसोड, वैशाली कठाने, जिजा कठाने, आम्रपाली बागडे, देवका बागडे, अन्नपूर्णा खोब्रागडे, शारदा गजभिये, रुख्मा बागडे, भीम आर्मीचे कार्यकर्ते बौध्द उपासक उपासिका आदी पुरुष व महिला गण मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाची सांगता भोजनदानाने करण्यात आली.