विनाऔषध कंट्रोल होऊ शकतो High BP! पोषणतज्ञांनी सांगितल्या प्रभावी पद्धती


 चुकीची जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयी, अति मीठ, साखर इत्यादींमुळे आज बहुतेक लोकांचा रक्तदाब वाढलेला आहे. रक्तदाब वाढल्यामुळे हृदय, मेंदू, किडनी आणि इतर आजारांचा धोका वाढतो.
डब्ल्यूएचओच्या मते, जगभरात सुमारे 1.28 अब्ज लोकांचे बीपी वाढले आहे, परंतु दुर्दैवाने त्यापैकी 46 टक्के लोकांना हे देखील माहित नाही की, त्यांना रक्तदाबाचा आजार आहे. जेव्हा रुग्ण इतर काही समस्यांवर उपचार घेण्यासाठी डॉक्टरांकडे जातात. तेव्हा त्यांना कळते की, त्यांचे बीपी वाढले आहे. डब्ल्यूएचओच्या मते, सुमारे 700 दशलक्ष लोकांना बीपीचा उपचार देखील मिळत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे ते बीपी तपासण्यासाठी डॉक्टरांकडे जात नाहीत. जगातील 7.5 दशलक्ष लोकांच्या मृत्यूला रक्तदाब जबाबदार आहे.
रक्तदाब का वाढतो याचे खरे कारण माहित नसले तरी मधुमेह, लठ्ठपणा, कोलेस्टेरॉल इत्यादी वाढल्याने बीपी वाढतो. न्यूट्रिशनिस्ट अंजली मुखर्जी यांनी नैसर्गिकरित्या उच्च रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी काही टिप्स दिल्या आहेत. उच्च रक्तदाब औषधांशिवाय अशा प्रकारे नियंत्रित होईल1. वजन नियंत्रण : एचटी न्यूजने न्यूट्रिशनिस्ट अंजली मुखर्जी यांच्या हवाल्याने म्हटले आहे की, लठ्ठपणा हे हाय बीपीचे सर्वात मोठे कारण आहे. म्हणूनच लठ्ठपणा कोणत्याही परिस्थितीत नियंत्रित करा. लठ्ठपणा कमी करण्यासाठी आहार आणि वेगवान व्यायामावर भर द्या. यानेही वजन कमी होत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्या. 2. माशांचे सेवन : पोषणतज्ञांच्या मते, आठवड्यातून दोन ते तीन दिवस मर्यादित प्रमाणात माशांचे सेवन केल्यास उच्च रक्तदाबाच्या समस्येपासून सुटका मिळू शकते. माशांच्या सेवनाने हृदयविकाराचा धोका कमी होतो हेही अनेक अभ्यासातून सिद्ध झाले आहे. 3. सिगारेट, अल्कोहोलला बाय करा : जर तुम्हाला हाय बीपी टाळायचे असेल तर सिगारेट आणि अल्कोहोलपासून दूर राहा. धूम्रपान आणि मद्यपान हे केवळ हृदयविकारासाठीच हानिकारक नाही तर त्यामुळे इतरही अनेक आजार होऊ शकतात. 4. नियमित चालणे : धावणारा घोडा आणि चालणारा माणूस कधीच म्हातारा होत नाही अशी एक म्हण आहे. दररोज चालण्याने उच्च रक्तदाब तर नियंत्रित होतोच पण इतर अनेक आजारांपासूनही सुटका मिळते. दररोज चालण्याने चिंता आणि नैराश्य दूर होते. यासोबतच रक्ताभिसरण सुरळीत राहते, ज्यामुळे ताजेपणा राहतो. 5. लसणाचे सेवन : उच्च रक्तदाब कमी करण्यासाठी लसूण हा रामबाण उपाय आहे. आयुर्वेदात लसणाचा उपयोग अनेक रोगांवर अनेक शतकांपासून केला जात आहे. लसूण कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइड्स देखील कमी करतो.
6. भाज्यांचा ज्युस : हाय बीपी नियंत्रित करण्यासाठी भाज्यांचा ज्युसखूप फायदेशीर आहे. विशेषतः बीटग्रासचा ज्युस. हा ज्युस उच्च रक्तदाब त्वरित कमी करतो.