ओबीसी आरक्षण, जातनिहाय जनगणनेच्या अनुषंगाने विधान परिषदेत उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस यांनी याबाबत ही महत्त्वाची घोषणा केली. फडणवीस म्हणाले की, केंद्र सरकारने जातिनिहाय जनगणनेची जबाबदारी राज्य सरकारांवर सोपवली आहे. बिहार सरकारने जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही बिहारमध्ये सध्या सुरू असलेली जात निहाय जनगणनेचा अभ्यास करण्यासाठी एक समिती पाठवणार आहोत. ही समिती याचा अभ्यास करणार आहे. त्यानंतर राज्यातील अमलबजावणीबाबत निर्णय घेण्यात येईल, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.