यवतमाळ : पत्रकारांना धमकी देणारे ओमप्रकाश मुडे यांनी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे यवतमाळ जिल्हाध्यक्ष अनिल राठोड व पदाधिकारी आणि बिटरगाव पोलीस ठाणेचे ठाणेदार श्री भोस यांच्या समक्ष माफी मागितली असून प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाच्या कोणत्याही पत्रकारांना यापुढे अपशब्द वापरणार नाही असे माफीनामा पत्र लिहून दिले असून संघाचे संस्थापक अध्यक्ष डी टी आंबेगावे यांना फोनवर संपर्क साधून यापुढे आपल्या संघटनेच्या कोणत्याही पत्रकारांना अपशब्द वापरणार नसल्याचे सांगितले आहे.
दैनिक दिव्य मराठीचे पत्रकार मैनुद्दीन सौदागर यांना ओम प्रकाश मुडे नामक व्यक्तीने माझ्या वडिलांच्या विरोधात बातमी का प्रसिद्ध केली म्हणून धमकी दिली होती. सदर व्यक्तीवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार गुन्हा दाखल करावा यासाठी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघ उमरखेड, ढाणकी, पोफळी, मारेगाव आदी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी पोलीस ठाण्यात निवेदन देऊन आक्रमक भूमिका घेतली होती.