शेतकरी जगला तरच देश सुखी व संपन्न होईल...!


शेतकर्‍यांचे आंदोलन चिरडण्यासाठी सरकारने काय काय नाही केले. देशद्रोही, खलीस्तानी, आंदोलनजीवी अशी खिल्ली उडवण्यात आली, तेव्हा आपण समजदार होता गप्प होतो. शेतकरी जगला तरच, देश सुखी व संपन्न होईल अये कोणालाच वाटत नव्हते.
हरभर्‍याच्या शेतातून माकडांना हुसकवणारा माणूस मेला म्हणून माकडं आनंदाने नाचू लागली. कारण त्यांना वाटलं पुढल्या वर्षी आपल्याला विरोध करायला कोणी नसेल. पण शेतकरीच जिवंत नसल्यामुळे पुढल्या वर्षी शेतात हरभराच नव्हता म्हणून माकडांवर उपाशी मरण्याची वेळ आली! तेव्हा कळलं,मरणारा माणूस हा शेतकरी होता..! बाकी आपण सर्वजण त्यावेळी नोकरदार कर्मचारी अधिकारी म्हणून गप्प होते.शेतकर्‍यांचे आंदोलन चिरडण्यासाठी सरकारने काय काय नाही केले. देशद्रोही, खलीस्तानी, आंदोलनजीवी अशी खिल्ली उडवण्यात आली, तेव्हा आपण समजदार होता गप्प होतो. शेतकरी जगला तरच, देश सुखी व संपन्न होईल अये कोणालाच वाटत नव्हते.


शेतकरी जगला,तरच शेतकर्‍यांच्या कष्टावर जगणारी माकडं जगतील, नाहीतर सर्व उपाशी मरतील.शेतकरी जगायला हवा व समृद्ध व्हायला हवा,शेतकर्‍यांच्या कष्टावर बंगले बांधणार्‍या,प्रचंड माया जमा कमविणार्‍या राजकारणी,व्यापारी,उद्योजक,दलाल,नोकरदार, वगैरे सर्वच संबंधित लोकांनी शेतकर्‍यांच्या न्याय मागण्यांना पाठींबा दिला पाहिजे होता. तेव्हा तो सुरक्षित नोकरी करणारा कर्मचारी अधिकारी शेतकरी आंदोलनापासून स्वत:ला वेगळा समजत होता.जेव्हा अटल बिहारी वाजपेयी नोकरदारांची पेन्शन योजना बंद केली तेव्हा सर्वच गप्प होते. जंतरमंतर वर फक्त सेवानिवृत्त मेजर,कमांडर माजी सैनिक आंदोलन करीत होते. बाकी नोकरी करणार्‍यांना आणि बारा राष्ट्रीय ट्रेड युनियनला त्याची दखल घ्यावी असे वाटले नाही.कारण सर्व राष्ट्रीय ट्रेड युनियनची नांवे वेगवेगळी असली तरी त्यांचे अंतिम धेय्य हे ब्राम्हणवादी राष्ट्र निर्माण करणे हे होते.त्यात शेतकरी जगला तरच देश सुखी व संपन्न होईल असे सांगितले नाही.


महागाई, बेरोजगारी,भ्रष्टाचारासाठी २०१४ पूर्वीचे आंदोलने आठवा.आता बहुसंख्य लोकांना वाटते महागाई भ्रष्टाचार कुठे आहे.शेतकरी,शेतमजूर,कामगार,कर्मचारी अधिकारी व्यापारी सर्व सुखी आनंदी आहेत.विरोधीपक्ष उगाच जनतेला भडकवण्याचा प्रयत्न करतात. अदानीने केलेला कोट्यवधीचा भ्रष्टाचार व त्यामुळे आर्थिकदृष्ट्या धोक्यात आलेल्या जीवन विमा निगम, भारतीय स्टेट बँक व इतर राष्ट्रीयकृत बँका,अदानीशी असलेले प्रधानमंत्री नरेंद्र मोदींचे संबंध,केंद्र सरकारद्वारे मूठभर पुंजीपतींचे लांगूलचालन झालेला भ्रष्टाचार त्याविरोधात बोलणार्‍यावर आकसाने होणारी ईडीची कारवाई, हे पाहून शेतकरी,शेतमजूर, संघटित कामगार,असंघटित कामगार एक जुटीने पुढे येतांना दिसत नाही. कारण नेतृत्व करणार्‍यांवर पोलीस नको ती कलमे लाऊन जेलमध्ये ताकत आहेत. त्यामुळेच न्याय कोणाकडे मागावा हाच प्रश्‍न निर्माण झाला आहे.


आम्ही मतदार म्हणून माणसे ओळखायला चुकलो, मतदारांना अजिबात माणसं ओळखता येतं नाहीत,मतदारांना वाटलंच नव्हते राष्ट्रीय पातळीवर काम करणारी संस्कार झालेली मानस अशी बदलतील,आम्हा मतदारांना कळलंच नाही असं कसे झाले ते. आपल्या दैनंदिन जीवनात आपण अनेकदा अनेकांकडून यासारखे वक्तव्य ऐकत असतो.याही पलीकडे जावून पाहिले तर प्रत्येकाला असंच वाटतं असत की हा पक्ष आणि त्या पक्षाचे नेते खूप सरळमार्गी देशभक्तआहेत,त्यांचा इतिहास कधी कोणा कोणाला कसे फसवले,आणि कोणा कोणाला कसे दुखावले याचा आहे. तो कोणी वाचला नाही. गर्वसे बोलो हम हिंदू है बोलत गेले आणि कधी कसे भारताचे नागरिक मतदार म्हणून फसवले गेले कळलेचं नाही. आपल्याला,आपल्या आजूबाजूच्या सगळ्यांनाच समाजातून, कुटुंबातून, नातेवाईकांकडून, मित्र मैत्रिणी इतर मंडळीकडून असे अनुभव येत असतात की मी यांना ओळखू शकलो नाही, हे बदलले, हे आधी असे वागत नव्हते आता असे का वागत आहेत? शेतकरी जगला तरच देश सुखी व संपन्न होईल.

सागर रामभाऊ तायडे
९९२०४०३८५९