खल्लार : पोलिस स्टेशन हद्दीतील नरदोडा येथे दोन अल्पवयीन मुलींच्या विनयभंग प्रकरणी परस्परविरोधी तक्रार खल्लार पोलिस स्टेशनला दाखल करण्यात आली असून याप्रकरणी खल्लार पोलिसांनी चार आरोपींविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याप्रकरणी दोन्हीकडील एक एक आरोपीस अटक करण्यात आली असून एक आरोपी फरार आहे तर एक आरोपी अल्पवयीन आहे या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
पहिल्या घटनेत अल्पवयीन मुलीच्या बहिणीने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी सुरेंद्र सहदेवराव तायडे, अनिल पूर्णाजी तायडे रा नरदोडा यांनी दि 20 मार्चला दुपारच्या सुमारास अल्पवयीन पिडितेस पकडून तिचे तोंड दाबून, कपडे ओढून अनैसर्गिक कृत्य करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी खल्लार पोलिसांनी आरोपी सुरेंद्र तायडे व अनिल तायडे यांचेविरुध्द अप न 78/23 कलम 354,354(अ),34,भादवी सहकलम 8,12 पोस्को नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
तर दुसऱ्या घटनेत 16 वर्षीय अल्पवयीन मुलगी हि दर्यापूरवरुन खाजगी शिकवणीवरुन दुपारच्या सुमारास घरी जात असताना गावातील गुरुदेव विद्यालयाजवळ आरोपी बाबाराव गुलाब तायडे, आश्विनकुमार बाबाराव तायडे रा नरदोडा यांनी रस्ता अडवून अल्पवयीन मुलीच्या अंगावरचे कपडे फाडून अनैसर्गिक कृत्य करण्याचा प्रयत्न केला.पिडीत मुलीने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी बाबाराव तायडे व अश्विनकुमार तायडे विरुध्द अप न 80/23 कलम 354,354(अ),34भादवी सहकलम 8,12 पोस्को नुसार गुन्हा दाखल करुन अटक केली आहे.
या घटनेतील चारही आरोपी हे एकाच गावातील असुन परस्परविरोधी तक्रार दिल्याने एकच खळबळ उडाली आहे.