कुरखेडा: हरणाची शिकार केल्याप्रकरणी एकास अटक


कुरखेडा : वनपरिक्षेत्राअंतर्गत येत असलेल्या गेवर्धा वनक्षेत्रातील कक्ष क्र.. 133 मध्ये जिवंत विद्युत तारेच्या सहाय्याने हरणाची शिकार केल्याप्रकरणी एकास अटक करण्यात आल्याची घटना बुधवार 8 मार्च रोजी उघडकीस आली. तर आरोपीस न्यायालयात हजर केले असता 14 दिवासांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. महादेव धोंडु तुलावी रा. गेवर्धा ता. कुरखेडा जि. गडचिरोली असे आरोपीचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, कुरखेडा वनपरिक्षेत्राअंतर्गत येत असलेल्या वर्धा वनक्षेत्रातील कक्ष क्रमांक 133 मध्ये आरोपी महादेव तुलावी याने जिवंत विद्युत तारेच्या सहाय्याने डुकराची शिकार करण्याचा बेत आखला. होळी सण असल्याने रात्रोच्या सुमारास वनकर्मचारी गस्त करत असतांना सदर परिसरात हरीण मृतावस्थेत आढळून आले. मात्र अधिक चौकशी केली असता हरीणची शिकार केल्याचे वनकर्मचारी यांना निष्पन्न झाले. दरम्यान महादेव तुलावी हा पहाटेच्या सुमारास घटनास्थळी दाखल झाला असता वनकर्मचाऱ्यांनी त्याला ताब्यात घेत विचारपुस केली. यावेळी तुलावी ने आपणच शिकार करण्यासाठी सापडा तयार केला होता असे कबुल केले. यावेळी त्याच्याकडून विद्युत तारेचा बंडल, कुन्हाड, लाकडी दांडे, लोखंडी सुरा, टॉर्च, लोखंडी अर्तीींग तार, सर्व्हिस वायर, काचेच्या बाटल्या इत्यादी साहित्य जप्त करण्यात आले.

याप्रकरणी आरोपीविरुध्द वन्यजीव अधिनियम 1972 चे कलमानुसार तसेच राखीव वन अंतर्गत विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 14 दिवसांची वन कोठडी सुनावली आहे. या प्रकारांचा पुढील तपास सुरु आहे अशी माहिती कुरखेडा वनपरिक्षेत्राच्या वनपरिक्षेत्र अधिकारी कुंभलकर यांनी 'The गडविश्व' शी बोलतांना दिली.