भडगांव - येथील शेतकरी सहसंघ खरेदी विभाग भडगांव..या संस्थेला..शासन हमी भावात शेतकरी चा मका/ज्वारी/ हरभरा मोजणी चे मार्केटिंग फेडरेशन यांनी आदेश दिले होते..
परंतु येथील चेअरमन प्रताप हरी पाटील सह काही भ्रष्ट संचालक यांनी शेतकरी चा मका/ हरभरा ज्वारी न मोजता डावलून व्यापारीचे गोडाऊन मोजून तिनकोटी चा भ्रष्टाचार केल्याचे जिल्हा स्तरीय तीन तालुक्यातील चौकशी समिती ने अहवाल विजय दोधा पाटील तंक्रारीवरून यांना सादर केला आहे.
संबंधित भ्रष्ट चेअरमन प्रताप हरी पाटील सह मेनेजर अवधूत देशमुख (मयत) सहभागी१९ संचालक. .वगैरे यांचे वर संगनमताने व्यापारीचे गोडाऊन मोजून शासनाची फसवणूक व तीन कोटी चा भ्रष्टाचार केल्याचे चौकशी त निष्पन्न झाले प्रकरणी..फौ गुंन्हा दाखल करण्या ची फिर्याद विजय दोधा पाटील सामाजिक कार्यकर्त यांनी भडगाव पो.स्टे.दिली आहे. परंतु पोलिसांनी फिर्यादी ची दखल न घेतल्याने मे.भडगाव न्यायालयात cr. 156 (3) अंन्तर्गत cr.m.a. 62/2021 अन्वये भ्रंष्ट आरोपी वर फौजदारी गुंन्हा दाखल करण्याचे पोलिसाना आदेश देण्याची मागणी विजय दोधा पाटील यांनी केली आहे...सदर प्रकरणी आज दि.१५ मार्च २३ रोजी भडगांव न्यांयालयात युक्तिवाद स तारीख आहे.