कोरची - येथील बाजार चौकात २०-२५ लोक अनेक वर्षापासून लहान सहान दुकाने थाटून - अतिक्रमण केले होते. या ठिकाणचे अतिक्रमण काढून त्याच जागेत बाजार संकुल बांधकाम करण्याचा निर्णय तीन वर्षांपूर्वी झाला होता. बाजार संकुलाचा आराखडा तयार करून शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला. त्यानंतर शासनाकडून मंजुरी सुध्दा मिळाली. या ठिकाणचे अतिक्रमण हटविण्यासाठी मागीलवर्षी मार्च महिन्यात सर्व अतिक्रमण धारकांना नोटीस बजावण्यात आली होती. परंतु काही लोक न्यायालयात गेले होते. तेथे त्यांना न्याय मिळाला नाही. त्यामुळे नगरपंचायत प्रशासनाने दोन मार्चच्या सायंकाळी ६ वाजेपर्यंत अतिक्रमण
हटविण्यासाठी नोटीस बजावली. परंतु लोकांनी अतिक्रमण हटविले नाही. आणि शेवटी तो दिवस आज उजाडला. तीन मार्चला सकाळी ९ च्यादरम्यान तहसीलदार माळी, अध्यक्ष हर्षलता भैसारे, उपाध्यक्ष हिरा राऊत, नगरसेवक डॉ. शैलेंद्र बिसेन, उपमुख्याधिकारी बाबासो हाक्के हे पोलिस अधिकाऱ्यांसह बुलडोजर घेऊन मोक्यावर आले.
प्रशासनाने लोकांना बजावून सांगितल्यावर लोकांनी आपापल्या दुकानातील सामान घाईगडबडीत काढले. त्यानंतर बुलडोजरच्या माध्यमातून अतिक्रमण हटविण्यात आला. यात कोणत्याही दुकानदारांचा तसा फारसा नुकसान झाला नसला तरी या हातावर आणून त्या हातावर खाणाऱ्या गरीब लोकांचे मोठे नुकसान झाले