कोण आहेत खुशबू सुंदर? ज्यांनी वडिलांवरच लैंगिक शोषणाचे आरोप केलेत?


दिल्ली : महिला दिनाच्या (Women’s Day) एक दिवस आधीच राष्ट्रीय महिला आयोगाच्या सदस्या खुशबू सुंदर (Khushbu Sundar) यांनी खळबळजनक खुलासा केला आहे. आयोगाच्या सदस्या, दाक्षिणात्य अभिनेत्री, भाजप नेत्या खुशबू सुंदर यांनी हा खुलासा केलाय. मी 8 वर्षांची असल्यापासून माझे वडील माझं लैंगिक शोषण करत होते, असा आरोप त्यांनी केला आहे. त्यावेळी मी कोणत्या मनःस्थितीत होते, याची आता कल्पनाही करू शकत नाही. आईला सांगावं तर आई विश्वास ठेवणार नाही, अशी भीती सतत वाटायची, असा गौप्यस्फोट खुशबु सुंदर यांनी केला आहे.


गंभीर आरोप काय?
खुशबू सुंदर यांनी एका मुलाखतीदरम्यान, खासगी आयुष्यातील घटनांचा खुलासा केला. मी आठ वर्षांची असल्यापासून वडिलांनी माझं लैंगिक शोषण करणं सुरु केलं होतं. पत्नीला, मुलांना मारणं आणि मुलींचं लैंगिक शोषण करणं हा जणू आपला अधिकारच आहे, असं त्यांना वाटायचं. पण अशा घटना मुलांच्या आयुष्यावर दीर्घकाळ परिणाम करणाऱ्या असतात. माझ्या आईने सर्वात अपमानास्पद वैवाहिक जीवन जगलं. मी 8 ते 15 वर्षांपर्यंत त्यांचे अत्याचार सहन केले. १५ व्या वर्षी त्यांच्याविरोधात बोलण्याचा धडस माझ्यात आलं. पण आई विश्वास ठेवेल की नाही, अशी शंका होती. अखेर मी बोलले. पण या घटनेनंतर वडिलांचं निधन झालं. त्यावेळी घरची आर्थिक स्थिती अत्यंत हलाखीची होती.. असा प्रसंग खुशबू सुंदर यांनी सांगितला.