*वृत्त प्रतिनीधी-: धनंजय गाळणकर*
*धुळे दि.२५ मार्च-: भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोस्तव निमित्त केंन्द्र शासनाचा महत्वाकांक्षी प्रकल्प " चला नदिला जाणून घेवूया, या अभियाना अंतर्गत धुळे जिल्ह्याची जीवन वाहिनी पांझरा नदीचा यात समावेश करणे बाबतचे निवेदन पांझराकाठ बचाव समितीचे अध्यक्ष श्री.मोतिलाल पोतदार यांनी धुळे जिल्हाधिकारी जलदजी शर्मा यांना निवेदन दिले. निवेदनात पांझरा नदीवरील ३ वर्षापूर्वी झालेल्या गुगल मॅप द्वारे पूर नियंत्रण रेषा सर्वे होऊन आखणीचा प्रस्ताव अद्यापही तापी विकास महामंडळ जळगाव येथील कार्यालयात धूळ खात पडला आहे. त्यामुळे पूर नियंत्रण रेषा आखणीला बाधा निर्माण झाल्याचे निदर्शनात आले आहे. तसेच पांझरा नदीच्या उगमा पासून ते संगमा पर्यंत प्रचंड अतिक्रमण होत आहे. व पांझरा नदीचा श्वास गुदमुरू लागला आहे, त्याला अटकाव न झाल्यास भविष्यात नमूद नदीच्या चौफेर भौगोलीक विस्तिर्ण परिसरातील जनजीवन प्रभावीत होवून मोठ्या प्रमाणात जीवीत आणि वित्त हानी होण्याची संभाव्य शक्यता आहे. तसेच भारतीय अमृत महोस्तव निमित्त माननीय प्रधान मंत्री नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून "चला नदीला जाणून घेवूया " या अंतर्गत ७५ नद्यांचा व नंतर २८ नद्यांचा समाविष्ट करण्यात आला. त्यात धुळे जिल्ह्याची भात नदीला देखील समाविष्ट केली आहे, तसेच आपल्या धुळे जिल्ह्यांची जीवन वाहिनी पांझरा नदीला देखील सामाविष्ट सदर प्रकल्पात करण्यात यावे. आणि सदरच्या प्रकल्पानुसार "पांझर काठ बचाव समितीच्या" पाठपुराव्यामुळे झालेल्या दि.१४/०४/२०१८ रोजी जलसंपदा मंत्री गिरिशजी महाजन यांनी पूर नियंत्रण रेषा आखणीसाठी सुमारे १६ लाख रुपयांची निविदा मे. चेतक इंजी. पुणे १४ यांनी गुगल मॅप द्वारे सर्वे २०१८ पासून झाला आहे. तो तापी विकास महामंडळ जळगावच्या कार्यालयात अद्यापही धूळ खात पडला आहे. त्याची शासकिय स्तरावर त्वरित कार्यवाही झाली पाहीजे.व पांझरा नदीच्या काठावर प्रचंड अतिक्रमण होत आहे, व नदीचा श्वास गुदमरू लागला आहे त्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालया कडून ठोस कार्यवाही होणे जरुरीचे आहे. यासाठी पांझराकाठ बचाव समिती लवकरच पांझरा बचाव रथ यात्रा व परिक्रमा काढणार आहे.तसेच "पांझरा काठ बचाव समितीच्या" कार्याची दखल घेऊन माननीय प्रधान मंत्री नरेंद्रजी मोदी यांनी सदरच्या रथयात्रा आणि परिक्रमेसाठी पत्राद्वारे समितीला शुभेच्छा दिल्या आहेत.अश्या आशयाचे निवेदन 'पांझरा काठ बचाव समितीचे' अध्यक्ष श्री.मोतीलाल पोतदार यांनी धुळे जिल्हाधिकारी जलदजी शर्मा यांना दिले.*