भाऊ मोबाईल जरा जपून वापर नाहीतर....


चंद्रपूर :- काही दिवसांपूर्वीच एका वृध्द व्यक्तीचा चार्जिंगवर मोबाईल लावून बोलत असतांना शरीर धडा वेगळा झाला होता. अशातच ही घटना ताजी असतांनाच पुन्हा एकदा मोबईलचा स्फोट होऊन दुचाकीचा चेंदामेंदा झाला आहे.

चंद्रपूर शहरातील विठ्ठल मंदिर वॉर्डातील एका मैदानाजवळ मोबाइलचा स्फोट झाला. सदर मोबाइल ओला झाल्याने दुचाकीवर सुकविण्यासाठी ठेवला असता काही वेळातच मोबाईलचा स्फोट झाला. मोबाईलचा स्फोट इतका भीषण होता की दुचाकीचा चेंदामेंदा झाला. सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही.

विठ्ठल मंदिर वॉर्डातील रहिवासी अशोक अंबिरवार यांचा मोबाइल पाण्याने ओला झाल्याने त्यांनी सदर मोबाईल वाळविण्यासाठी तो दुचाकीवर बाहेर ठेवला होता. मात्र काही वेळातच त्याचा स्फोट झाला. अचानक मोठा आवाज झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये खळबळ उडाली. सदर घटनेत एमएच ३४ वाय ३३४३ दुचाकीचे नुकसान झाले. परंतु, सुदैवाने दुचाकी जवळ कुणीही नसल्याने जीवितहानी मात्र टळली आहे.