साहेब, दीड लाख रुपयांमध्ये घरकुल बांधायचे कसे ?





 गडचिरोली : केंद्र सरकार व राज्य सरकार गोरगरिबांना हक्काचे घर मिळावे म्हणून विविध योजनांच्या माध्यमातून गोरगरिबाला घरकुल देते. मात्र, अल्प अनुदानामुळे अनेक घरकुल लाभार्थ्यांना कर्जबाजारी होऊन घरकुल बांधकाम करावे लागते. शासनाकडून मिळणाऱ्या अल्प अनुदानावर घरकुलाचे पूर्ण बांधकाम करणे शक्य नसल्याने कर्ज तर कधी बचत गटाच्या दारात उभे राहावे लागत आहे. त्यातच दीड लाख रुपयांच्या अनुदानातून घरकुल बांधायचे कसे, असा सवाल लाभार्थ्यांनी उपस्थित केला आहे....