गडचिरोली,(जिमाका)दि.27: भारतातील उमेदवारांना परदेशातील नोकरी उपलब्ध होण्यासाठी पहिला आंतरराष्ट्रीय रोजगार मेळावा दिनांक 21/02/2023 ते 26/05/2023 या दरम्यान नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कार्पोरेशन दिल्ली (एनएसडीसी) यांचे मार्फत आयोजीत करण्यात आलेला आहे. सदर रोजगार मेळाव्यामध्ये उमेदवार/उद्योजकांना सहभागी होण्याकरीता खालीलप्रमाणे लिंक उपलब्ध करून देण्यांत आलेली आहे.
• सदर जॉब फेअर मध्ये उमेदवारांनी सहभागी होण्यासाठी खालील लिंक वर नोंदणी करावयाची आहे.
https://www.kaushalmahotsav.nsdcdigital.org/International/Candidate/
• तसेच विविध कंपन्या /उद्योजकांनी सहभागी होण्यासाठी खालील लिंकवर नोंदणी करावयाची आहे.
www.kaushalmahotsav.nsdcdigital.org/International/Company/
सदर रोजगार मेळावा हा ऑनलाइन व ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. मेळाव्यामध्ये सहभागी होण्याकरीता उमेदवारांना एनएसडीसीच्या पोर्टलवर वरील प्रमाणे नोंदणी करणे आवश्यक आहे. मेळाव्यामध्ये उमेदवारांची प्राथमिक फेरी व अंतीम फेरीचे आयोजन करण्यात येणार असून समारोपीय कार्यक्रमसुद्धा आयोजीत केलेला आहे. या मेळाव्यामध्ये सहभागी होणा-या उद्योजकातर्फे प्राथमिक व अंतीम फेरी ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार असून समारोपीय कार्यक्रमाकरीता संबंधीत उद्योजक प्रत्यक्ष हजर राहणार आहे. वेगवेगळया झोन मध्ये वेगवेगळया दिवशी प्राथमिक आणि अंतीम फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.
या मेळाव्यामध्ये युएसए, कॅनडा, युके, युरोप , पश्चिम आणि दक्षिण आशिया, जपान, आस्ट्रेलिया, न्युझिलंड, पूर्व आणि दक्षिण पूर्व आशिया व भारतातील नामांकीत उद्योजक ऑनलाइन उपस्थित राहणार आहे.
ऑटोमोटीव्ह, कृषी, कारपेंटर, बांधकाम, ड्रायव्हर, इलेक्ट्रिशिअन, फॅसिलीटी मॅनेजमेंट, फूड आणि बेव्हरेज, हेल्थ केअर, हॉस्पीटॅलीटी, आयटी , लॉजीस्टीक, ऑइल ॲड गॅस, प्लंबर, रेफ्रिरेजेशन, रिटेल सर्व्हिस, शिपयार्ड, वेल्डर इ. क्षेत्रामध्ये उमेदवारांना नोकरीची संधी मिळणार आहे. उमेदवारांकरीता महाराष्ट्रात मुंबई येथे प्राथमिक आणि अंतीम फेरीचे आयोजन करण्यात आलेले आहे.
सदर जॉब फेअरचे प्रक्रीया आणि टाईमलाईन पूढीलप्रमाणे आहे.-
स्क्रीनिंग आणि भाषा चाचणी ऑनलाइन, उमेदवार ऑनलाइन मॅपीग, भारतातील विविध शहरामध्ये प्राथमिक फे-या दि.11 एप्रिल ते 30 एप्रिल 2023, संपूर्ण भारतातील विविध शहरामध्ये अंतिम फे-या दि. 8 मे ते 15 मे 2023, समारोपीय समारंभ दिनांक 26 मे 2023 या आंतरराष्ट्रीय रोजगार मेळाव्याच्या माध्यमातून किमान 2000 उमेदवारांना आंतरराष्ट्रीय स्तरावर नोकरीची संधी प्राप्त करून देण्याचे शासनाचे उद्दिष्ट आहे.
निवड झालेल्या उमेदवारांचे परदेशात प्रस्थानापूर्वी आवश्यक प्रशिक्षण एनएसडीसी मार्फत आयोजीत करण्यात आले आहे. या बाबत अधिक माहीतीकरीता श्रीमती पंघोरी बोरगोएन व्यवस्थापक एनएसडीसी मोबाइल क्र 9599495296 आणि ईमेल आयडी pangkhuri.borgohain@nsdcindia.org येथे संपर्क साधावा. नोंदणी करण्याची अंतिम मुदत दिनांक 09 एप्रिल 2023 ही आहे.
पहिल्या आंतरराष्ट्रीय रोजगार मेळाव्यामध्ये गडचिरोली जिल्हयातील जास्तीत जास्त उमेदवारांनी लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय संकुल बॅरेक क्र.2 गडचिरोली यांनी केले आहे.
****