आनिस शहर शाखेतर्फे न्यायालयात कार्यरत असलेल्या महीला कर्मचाऱ्यांचा सत्कार संपन्न....!*


धुळे [प्रतिनिधी] : धुळे शहर व जिल्हा अन्याय अत्याचार निर्मुलन समितीच्या पदाधिकाऱ्यांचे वतिने धुळे जिल्हा व सत्र न्यायालयीन कर्मचारी व वकील संघाच्या विधीतज्ञ यांचा पेन गुलाबपुष्प देवुन समितीच्या प्रदेश उपाध्यक्षा प्रो. प्रेमलताताई जाधव यांचे नेतृत्वाखाली जागतिक महीला दिनानिमित्त सत्कार करण्यात आला.या प्रसंगी धुळे न्यायालय येथील महिला दिवानी न्यायाधीश न्यायमूर्ती. वाय जी देशमुख मॅडम, न्यायमूर्ती कुलकर्णी मॅडम न्यायमूर्ती चांडक मॅडम न्यायमूर्ती चव्हाण मॅडम समुपदेशक खरात मॅडम ,धुळे एडवोकेट बारच्या महिला सचिव एडवोकेट रसिका निकुंभ धुळे बारचे उपाध्यक्ष एडवोकेट भिसे सर, धुळे अन्याय अत्याचार समितीच्या एडवोकेट मधुमती ठाणगे, एडवोकेट सुप्रभा ठाणगे ,एडवोकेट एकता निळे, ज्योत्स्ना पारधी, ललिता ताई शिरसाट ,माधुरी निकम, शोभा नगराळे परमजीत कौर ,अनिता बैसाणे, सरला निकम, सारिका सूर्यवंशी ,सरला गायकवाड, भारती शिंदे, हे पदाधिकारी कार्यक्रमास उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधी प्राधिकरण विभागाचे सचिव न्यायमूर्ती स्वामी साहेब हे होते एडवोकेट रसिका निकुंभ यांनी त्यांच्या भाषणात महिलांना संदेश दिला की तुम्ही स्वावलंबी आहात आणि जोपर्यंत तुम्ही कोणत्याही गोष्टीचे धाडस करत नाही तोपर्यंत त्या गोष्टी आपणास यश येत नाही.एडवोकेट भिसे सर यांनी त्यांच्या भाषणात सांगितले की सर्व धर्माच्या मंदिरांमध्ये पुरुष हाच पुजारी असतो स्त्री का नाही त्यासाठी कायद्यात सुधारणा होणे गरजेचे आहे. न्यायमूर्ती स्वामी साहेबांनी त्यांच्या भाषणात सांगितले की सांगितले की, महिलांनी मुलांवर संस्कार करणे रुजविणे अत्यावश्यक असून स्त्रीने पुढाकार घेतल्यास आणि न डगमगता प्रत्येक गोष्टीचा सामना केल्यास ती गोष्ट अशक्य ती शक्य होते. जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रम यशस्वीतेसाठी एडवोकेट मधुमती ठाणगे एडवोकेट रसिका निकुंभ एडवोकेट भिसे सर न्यायमूर्ती स्वामी साहेब यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले . समितीच्या वतीने उज्वलाताई पगारे यांनी सर्वांचे आभार मानले.
अनिता बैसाने,
जिल्हा सरचिटणीस,
(अ.अ.नि.स),
सामाजिक कार्यकर्त्यां.