चामोर्शी तालुक्यातील तरुणाची आत्महत्या


गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यातील आष्टी पासून जवळच असलेल्या जैरामपुर येथील वैभव सदानंद दिवसे (23) या युवकाने स्वताच्याच शेतशिवारात सागाच्या झाडाला गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना आज दुपारी घडली. जैरामपूर येथील शेतकरी वासुदेव भाऊजी दिवसे हे आज दुपारी 3 वाजताच्या सुमारास आपल्या शेताकडे गेले असता त्यांना शेतातील एका सागाच्या झाडाला वैभव दिवसे हा दोरीने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आला. याबाबतची माहिती वासुदेव दिवसे यांनी घरी जावून वैभवच्या कुटुंबीयांना दिली. कुटुंबीयांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर सदर घटनेची माहिती आष्टी पोलिस स्टेशनला दिली. पोलिस निरीक्षक कुंदन गावडे व पोलिस कर्मचारी यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. पुढील तपास आष्टी पोलिस करीत आहे. आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही.