बेमुदत संपात सहभागी होणाऱ्या कर्मचाऱ्यावर होणार शिस्तभंगाची कारवाई - संजय मीना जिल्हाधिकारी, गडचिरोली


गडचिरोली: , सरकारी निमसरकारी शिक्षक- शिक्षकेत्तर संघटना समन्वय समिती, जिल्हा गडचिरोली यांनी या कार्यालयास दिलेल्या निवेदनानुसार आपले अधिनस्त अधिकारी व कर्मचारी हे जुन्या पेन्शन योजनेच्या मागण्यासाठी दिनांक १४ मार्च, २०२३ पासुन बेमुदत संपात सहभागी होणार असल्याचे निर्दशनास आलेले आहे. संपात सहभागी होणे हे कार्यालयीन शिस्तीला अनुसरुन नसून प्रशासकीय कामकाजात खोळंबा व सर्वसामान्य जनतेची कामे विहित वेळेत होणार नाहीत.

तरी, दिनांक १४ मार्च, २०२३ पासून सुरु होणा-या संपामुळे अत्यावश्यक सेवा तसेच प्रशासकीय कामकाजात खोळंबा होणार असल्याने आपले अधिनस्त अधिकारी व कर्मचारी यांना संपात सहभागी होत असल्याचे सबबीवर आपले स्तरावरुन कारणे दाखवा नोटिस बजाविण्यात यावे. तसेच आपले अधिनस्त सर्व कार्यालये नियमितपणे चालु राहतील याची खबरदारी घ्यावी..

(संजय मीना)

जिल्हाधिकारी, गडचिरोली