पिपरटोला इथे राणी दुर्गावती मडावी पुतळ्याचा अनावरण व समाज प्रबोधन.

दिनेश बनकर कार्यकारी संपादक सुपर फास्ट बातमी


*_आरमोरी_* _(जिल्हा गडचिरोली)_ तालुक्यातील पिपरटोला (नरचुली) दिनांक 30 मार्च रोज गुरुवारला वीरांगना राणी दुर्गावती मडावी,सल्ला गांगरा शक्तीचे अनावर सोहळा व गोंडी धर्म संमेलन,समाज प्रबोधन सोहळा पार पडले. 
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विश्वेश्वराव दर्रो माजी सरपंच,उद्घाटक सुधाकर आत्राम गोंगपा प्रदेश महासचिव महा.सहउद्घाटक माजी सैनिक दिवाकर पेंदाम गोंडवाना महासभा,वामन कुमरे, कोया पुनेम ध्वजारोहक प्रतिभा मडावी, प्रशांत मडावी गोंगपा जिल्हाध्यक्ष,प्रमुख मार्गदर्शक सरपंच संदिप दादा वरखडे, गणेश हलामी,गोंडी भाषा तज्ञ रमेश कोरचा ,नंदकिशोर नैताम,भुमक रामचंद्र काटेंगे, राजेश इरपाते तर प्रमुख पाहुणे सरपंच प्रियंका हलामी, प्रभाकर पदा, रामचंद्र उईके, चंद्रशेखर पदा,सेवक मडावी, सदाराम हलामी, प्रियंका हलामी,पल्लवी कुमरे, हसीना उसेंडी, निर्मला कुमरे, मोहन तुलावी, जीवन पदा,रसुला उसेंडी, पांडुरंग कुमोटी,संदिप हलामी, मोहन तुलावी,संजय कुमरे,प्रकाश हलामी आदि मान्यवर उपस्थित होते.
                *कार्यक्रमात* वीरांगना राणी दुर्गावती मडावी यांच्या जीवनचरित्रावर प्रकाश टाकताना तीचे दूरदर्शीपणा, समाज कौशल्या, प्रजेबद्दलची आपुलकी,प्रजेच कल्याण ,आत्मविश्वास,शत्रुंच्या मनात भीती आदि गुणावर प्रकाश टाकण्यात आले.गोंडी भाषा, संस्कृती,इतिहास,उच्च शिक्षण, साहित्य लेखन,व्यवसाय, समाजावर होणारे अन्याय अत्याचारावीरुद्ध उठाव आदि विषयांवर विचार मंथन करण्यात आले. 
*सर्व प्रथम* गावातून पारंपारिक गोंडी वाद्याने भव्य रॅली काढुन पुतळ्याचे अनावर व कोया पुनेम ध्वजारोहण करण्यात आले. 
कार्यक्रमाचे संचालन विनोद हलामी, प्रास्ताविक वासुदेव तुलावी, आभार राहुल मडावी यांनी मानले. कार्यक्रमाला हजारो सगा बांधव उपस्थित होते.